crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

जळीतग्रस्त कोळी कुटुंबाला महादेव कोगनुरे यांचा मदतीचा हात!

बंकलगी येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोगनुरे यांनी भेट देत केले सांत्वन

 

बंकलगी, प्रतिनिधी

 

बंकलगी येथील श्री. बसवराज गोविंद (ढोणज) कोळी यांच्या घराला गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे कोळी कुटुंबावर मोठे संकट ओढवले. या घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे यांनी तातडीने दखल घेत संबंधित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.

 

 

 

एम. के. फाउंडेशनचे बंकलगी येथील काही सहकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे या घटनेची माहिती महादेव कोगनुरे यांना दिली. गावातील सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेतून संकटग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात मिळावा, या उद्देशाने ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. त्यानंतर कोगनुरे यांनी तत्परतेने कुटुंबाची भेट घेत मदतीचा खारीचा वाटा उचलला.

 

 

 

अचानक आलेल्या या संकटामुळे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून, अशा कठीण प्रसंगी समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि ग्रामस्थांनी एकजुटीने संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. सामाजिक जाणीव, माणुसकी आणि परस्पर सहकार्याच्या भावनेतून केलेली मदत संकटग्रस्त कुटुंबाला नव्याने उभे राहण्यासाठी बळ देणारी ठरते.

 

 

 

या वेळी बंकलगी येथील रेवण सिद्ध कोणदे, राजशेखर सगरे, काशप्पा गुरुजी, मंत्रीशे गुरुजी, भाग्यांण्णा दुषवंत, चंदू कोणदे, नागनाथ कोणदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button