वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य; खत दुकानदार सतीश भोसले यांना अटकपूर्व जामीन

सोलापूर
मंगळवेढा येथील खत दुकानदार सतीश मनोहर भोसले रा., पाटकळ, ता., मंगळवेढा यांना भेसळयुक्त खताचा साठा करून त्याची विक्री केली या प्रकरणी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या प्रकरणात पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, मंगळवेढा कृषी कार्यालयाला गोपनीय माहिती मिळाली की काही दुकानांमध्ये अमोनियम सल्फेट या खताच्या बॅगमध्ये मीठ सदृश्य खताची बेकायदेशीर विक्री केली जात आहे. माहितीच्या आधारे दिनांक 8/4/2026 रोजी पाटकळ ता. मंगळवेढा येथील प्रहार उद्योग समूहाचे खत दुकान व गोडाऊन तपासणी केली असता त्या ठिकाणी माहितीप्रमाणे बेकायदेशीर विक्री होत असल्याचे निदर्शनास आले, नंतर सदर माल धाड टाकून ताब्यात घेतला व त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये सदर दुकानदार सतीश भोसले यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी पंढरपूर येथील सत्र न्यायालयात Adv. शशी कुलकर्णी यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.त्यास सरकारी पक्षाने तीव्र विरोध केला.
त्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की यातील स्वतः दुकानदार कोणत्याही प्रकारची खत निर्मिती करत नाहीत, तो अधिकृत परवानाधारक कंपनीकडून खत खरेदी करतो त्यामुळे जरी या संबंधातील काही त्रुटी अनियमितता असल्यास त्यात स्वतः दुकानदारास जबाबदार धरता येणार नाही. अर्जदार पोलिसांना तपास कामात संपूर्ण सहकार्य करणे तयार आहे.
सदरचा युक्ती वाद केला व नामदार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायनीवाडे सादर केले अर्जदारांच्या वकिलांचा युक्ती वाद ग्राह्य धरून पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने खत दुकानदार सतीश भोसले यांस पोलीस स्टेशन हजेरी च्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला सदर प्रकरणात आरोपी दुकानदार यांच्यातर्फे adv. शशी कुलकर्णी, adv. ओंकार बुरकुल व adv. आनंद अंत्रोळीकर यांनी काम पाहिले.
केस क्रमांक – 425/2016 कोर्ट पंढरपूर येथील सत्र न्यायाधीश
श्री. देशमुख



