crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

अँड आनंद कुर्डूकर बनले नूतन जिल्हा सरकारी वकील

 

सोलापूर

 

 

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकीलपदाची सूत्रे सध्या सहाय्यक सरकारी वकील असलेले आनंद कुर्डूकर यांना सोपवत असल्याची अधिसूचना आज शासनाने काढली. त्याचप्रमाणे प्रदीप रजपूत यांची सेवा तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणल्याचे शासनाकडून परिपत्रकात जाहीर करण्यात आले.

 

 

 

 

आनंद कुर्डूकर हे सन १९८५ पासून वकिली व्यवसायात असून गेल्या २० वर्षांपासून सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजपावेतो ३५१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावणेत सरकारपक्षातर्फे मोलाची कामगिरी केलेली असून त्यांचे विधिक्षेत्रातील या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचेकडे जिल्हा सरकारी वकीलपदाची धुरा सोपविली आहे.

 

 

त्यांचेवर यासाठी माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, ज्येष्ठ विधिज्ञ उमेश मराठे, अँड शांतवीर महिंद्रकर वगैरे सर्व वकीलवर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button