india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी, पशुधनासाठी टँकरद्वारे पाणी व चारा वाटपाचा शिवप्रकाश कृषी विज्ञान मंडळाचा उद्या गुरुवारी देगावमध्ये उपक्रम : दत्तात्रय वानकर…

 

सोलापूर – ( प्रतिनिधी ) –

 

 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार ( भाऊ ) गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकरी बांधव आणि पशुधनासाठी टँकरद्वारे पिण्याचे पाणी व चारा वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम उद्या गुरुवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता वानकर वस्ती देगाव रोड येथील आश्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.शिवप्रकाश कृषी विज्ञान मंडळाच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर यांनी दिली.

 

 

 

आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजप शहराध्यक्ष
रोहिणी तडवळकर,
भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, प्रभाग ६ चे भाजपचे पॅनल प्रमुख तथा नगरसेवक गणेश वानकर, आरोग्य समितीचे सभापती तथा नगरसेवक सुनील खटके, नगरसेविका सोनाली गायकवाड आणि नगरसेविका मृण्मयी गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सामाजिक उपक्रम पार पडणार असल्याचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर यांनी सांगितले.
दुष्काळाच्या परिस्थितीत पाण्याअभावी शेतकरी, पशुपालक आणि मुक्या जनावरांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शिवप्रकाश कृषी विज्ञान मंडळाच्यावतीने वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन शेतकरी व पशुपालक यांच्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

 

 

 

ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि पशुपालकांना बसतो. जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, चाऱ्याची व्यवस्था करणे आणि दैनंदिन पशुपालनाचा खर्च भागविणे ही मोठी आव्हाने सध्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहेत . अशा परिस्थितीत टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि चारा वाटप यांसारखे उपक्रम शेतकरी कुटुंबांना दिलासा देणारे ठरू शकतात.

 

 

 

पालकमंत्री जयकुमार ( भाऊ ) गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता शेतकरी व पशुधनाच्या गरजांशी संबंधित उपक्रमाला महत्त्व देण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागाला मदतीचा हात देणे, पशुधनाचे संरक्षण करणे आणि शेतकऱ्यांना आधार देणे, हा या उपक्रमामागील सामाजिक दृष्टिकोन आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू शेतकरी आणि पशुपालकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचेही अध्यक्ष दत्तात्रय वानकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button