crimeEpaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर:- ॲड. जयदीप माने

रावगाव

 

ता. करमाळा येथील वसंत केकान खून खटल्यातील आरोपी महादेव उत्तम ढाकणे सह नऊ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अश्विन भोभे यांनी मंजूर केला. महादेव ढाकणे, कल्याण ढाकणे, जयदत्त ढाकणे, सुमित ढाकणे, दिनकर ढाकणे, अरुणा ढाकणे, उर्मिला ढाकणे, खुशवार्ता ढाकणे, वंदना ढाकणे अशा नऊ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर उच्च न्यायालयाने मंजूर केला.
फिर्यादी व आरोपीं मध्ये शेती वहिवाटण्याच्या कारणावरून अनेक वर्षांपासून वाद होता व याच वादातून दि. २०. ०६. २०२६ रोजी फिर्यादी शुभम केकान हे शेताची ट्रॅक्टरने मशागत करत असताना आरोपींनी हत्यारांसह हल्ला चढवून फिर्यादी शुभम केकान यांना मारहाण केली व त्यांचे वडील वसंत केकान यांचा खून केला असा आरोप फिर्यादी शुभम केकान यांनी केला होता. आरोपींविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

 

 

 

आरोपींनी बार्शी सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. जयदीप माने यांनी युक्तिवाद केला की, आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप मोघम स्वरूपाचे आहेत, कोणत्या आरोपीने मयतास मारले हे स्पष्ट नमूद करण्यात आलेले नाही, मयताचा मृत्यू आरोपींच्या मारहाणीमुळे झालेला नाही, घटने दिवशी आरोपींनी फिर्यादी विरुद्ध दिलेल्या फिर्यादीला शह देण्यासाठी आरोपींना खोटेपणाने गुंतवण्यात आलेले आहे असा युक्तिवाद केला.

 

 

 

 

न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी महादेव ढाकणे, कल्याण ढाकणे, जयदत्त ढाकणे, सुमित ढाकणे, दिनकर ढाकणे, अरुणा ढाकणे, उर्मिला ढाकणे, खुशवार्ता ढाकणे, वंदना ढाकणे अशा नऊ आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणी सर्व आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. एस. एच. यादव यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button