india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

ईच्छा‎ भगवंताची‎ नवरात्र‎ महोत्सव मंडळाचा‎ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना‎ २ लाख ५१‎ हजारांचा मदतीचा‎ हात !

पालकमंत्री‎ जयकुमार भाऊ गोरे यांच्या‎ आवाहनाला प्रतिसाद;‎ दीर्घायुष्यासाठी‎ ग्रामदैवता रूपाभवानी मंदिरात‎ अभिषेक‎ व‎ महाआरती,‎ दुष्काळाचे‎ सावट‎ दूर होण्यासाठी देवीचरणी साकडे

 

सोलापूर‎ :‎

 

राज्यातील दुष्काळग्रस्त‎ शेतकऱ्यांच्या‎ मदतीसाठी‎ ईच्छा भगवंताची‎ नवरात्र महोत्सव मंडळाच्या‎ वतीने २ लाख‎ ५१ हजार रुपयांचा‎ धनादेश जिल्हाधिकारी‎ एस.‎ कार्तिकेयन यांच्याकडे‎ सुपूर्द‎ करण्यात आला. महाराष्ट्राचे‎ ग्रामविकास मंत्री‎ तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या ५१‎ व्या वाढदिवसानिमित्त‎ हा‎ सामाजिक उपक्रम‎ राबविण्यात‎ आला. राज्यातील दुष्काळी‎ परिस्थितीचे‎ गांभीर्य लक्षात‎ घेऊन पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी,‎ बॅनरबाजी‎ आणि अनावश्यक‎ खर्च‎ टाळण्याचे‎ आवाहन‎ केले‎ होते. वाढदिवस‎ मोठ्या‎ प्रमाणात साजरा करण्याऐवजी‎ दुष्काळग्रस्त‎ शेतकऱ्यांच्या‎ मदतीसाठी‎ पुढे यावे, शेतकऱ्यांच्या‎ पाठीशी खंबीरपणे उभे राहावे‎ आणि‎ मदतीच्या‎ माध्यमातूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात,‎ असे आवाहन त्यांनी‎ हितचिंतक‎ व कार्यकर्त्यांना‎ केले होते.‎ या‎ आवाहनाला प्रतिसाद‎ देत मंडळाने शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात‎ पुढे‎ केला. यावेळी‎ आमदार सचिन दादा‎ कल्याणशेट्टी म्हणाले,‎ मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस साहेब यांच्या‎ नेतृत्वाखालील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे‎ उभे‎ आहे.

 

 

‎ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाने घेतलेला पुढाकार प्रेरणादायी‎ असून,‎ मंडळाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. भाजपा नगरसेवक किसन‎ जाधव म्हणाले,‎ राज्यात‎ दुष्काळी‎ परिस्थिती जाहीर‎ झाली‎ असून‎ महायुती‎ सरकार‎ शेतकऱ्यांच्या‎ मदतीसाठी‎ खंबीरपणे उभे‎ आहे‎ पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे‎ यांनी वाढदिवसानिमित्त‎ अनावश्यक‎ खर्च‎ टाळून दुष्काळग्रस्त‎ शेतकऱ्यांना‎ मदत‎ करण्याचे‎ आवाहन‎ केले‎ होते.‎ त्याला प्रतिसाद‎ देत ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराचे संस्थापक तथा आधारस्तंभ‎ लक्ष्मण मामा‎ जाधव,‎ माजी‎ नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, नगरसेविका सौ अंबिका नागेश‎ अण्णा गायकवाड, अॅड.‎ अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाने आणि सोलापूर शहर मध्यचे दमदार युवा आमदार‎ देवेंद्रदादा कोठे‎ यांच्या‎ प्रेरणादायी‎ नेतृत्वाने, पाणीदार‎ आमदार‎ सचिन‎ दादा‎ कल्याणशेट्टी‎ यांच्या‎ उपस्थितीत शेतकऱ्यांसाठी २‎ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.‎

 

 

 

 

याप्रसंगी‎ महापौर‎ विनायकदादा‎ कोंड्याल,‎ भाजपा शहर‎ जिल्हाध्यक्ष‎ शशिकांत नाना‎ चव्हाण,‎ नगरसेविका सौ चैत्रालीताई‎ शिवराज‎ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते‎ शिवराज गायकवाड,‎ युवा नेते‎ चेतन‎ नागेश‎ अण्णा गायकवाड आदींची उपस्थिती होती. ईच्छा‎ भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचा हा उपक्रम शेतकऱ्यांना‎ दिलासा‎ देणारा आहे. दरम्यान,‎ पालकमंत्री जयकुमार‎ भाऊ गोरे यांना‎ दीर्घायुष्य लाभावे आणि‎ राज्यातील‎ दुष्काळी परिस्थितीचे लवकरात‎ लवकर‎ निवारण व्हावे, यासाठी किसन‎ जाधव‎ यांनी सोलापूरची‎ ग्रामदैवता कुलस्वामिनी‎ श्री‎ रूपाभवानी मंदिरात अभिषेक व‎ महाआरती करून देवीचरणी‎ साकडे‎ घातले.‎ याप्रसंगी नगरसेविका‎ चैत्राली‎  शिवराज‎ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज‎ गायकवाड,‎ श्रीकांत‎ गिड्डे,‎ वसंत‎ कांबळे, माणिक‎ कांबळे, महादेव राठोड,‎ सागर‎ गायकवाड,‎ संजय राजपूत, नागराज गायकवाड,‎ यल्लाप्पा‎ शिवपुरे आदींची उपस्थिती‎ होती‎ यावेळी किसन जाधव‎ यांनी‎ राज्यात‎ सुख-शांती नांदावी आणि‎ शेतकऱ्यांवरील संकट‎ दूर‎ व्हावे,‎ अशी प्रार्थनाही‎ त्यांनी केली.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button