crimemaharashtrapoliticalsocialsolapur

पोलिसांनी अर्जदाराविरुद्ध कोणतीही जबरदस्तीची कारवाही करू नये कोल्हापूर उच्च न्यायालय…

 

सोलापूर

 

महादेव शंकर गुरु वय 28 राहणार आहरेवाडी तालुका दक्षिण सोलापूर. यास डांबून ठेवून
मारहान करून व्याजाचे पैसे मागणी केल्याप्रकरणी परशुराम रामचंद्र क्षेत्री, राहणार देवकोटे तालुका अक्कलकोट यास *कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शिवकुमार दिघे* यांनी पोलिसांनी अर्जदाराविरुद्ध कोणतीही जबरदस्तीची कारवाही करू नयेअसा आदेश पारित केला.

 

यात हकीकत अशी की,
महादेव गुरव याने किरण सासवे याच्याकडून 25000, रवी सासवे याच्याकडून 50000, सतीश सासवे याच्याकडून 25000, तर अर्जदार परशुराम क्षेत्री याच्याकडून 20000 असे आयपीएल क्रिकेटमध्ये सट्टा खेळण्यासाठी घेतले होते. ते पैसे त्याने आयपीएल सट्ट्यामध्ये हरले होते. त्यानंतर वरील सर्वजण हे त्यास 30 ते 40% दराने व्याजासह पैशाची मागणी करू लागले, त्यामुळे त्याने एफ .डी. मोडून.
पंचांसमक्ष व्याजासह पैसे परत केले होते.

 

 

 

दिनांक 16/06/2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास वरील चौघांनी त्यास बंकलगि येथील चौकात बोलवून त्यास व्याजाच्या पैशाची मागणी करून मारहाण करू लागले. त्यानंतर त्यास अर्जदार क्षेत्री याच्या घरात डांबून ठेवले.
तसेच त्याच्या खिशातील 8000 रुपये मोबाइल काढून घेतला. दिनांक 17/5/2025 रोजी सोलापूर येथील कोर्टाकडे घेऊन जाऊन 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून घेतले व परत त्याच घरात डांबून ठेवले .

 

 

दिनांक 19/6/2025 रोजी सकाळी आठ वाजता त्याने संडासचा बहाना करून तो तिथून पळून गेला अशाची फिर्याद महादेव शंकर गुरव यांनी दिनांक 24/07/2025 रोजी वळसंग पोलीस ठाणे येथे दिली होती.
त्यावरवरून परशुराम क्षेत्री यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला.
यावर परशुराम क्षेत्री यांनी ऍडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.

 

 

अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात यातील फिर्यादीने घेतलेले पैसे हे परत न देण्यासाठी प्रस्तुतची कपोलकल्पित केस दाखल केली असल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावरून न्यायाधीशांनी पुढील तारखे पावेतो पोलिसांनी अर्जदाराविरुद्ध कोणतीही जबरदस्तीची कारवाही करू नये असा आदेश पारित केला.
*यात अर्जदारतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रियंका राणे यांनी काम पाहिलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button