maharashtrapoliticalsocialsolapur

राजकारणातील बापमाणूस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:- आमदार विजयकुमार देशमुख…

शहर उत्तरच्या कार्यकर्त्यांना कुणी त्रास दिला तर तर हेच कार्यकर्ते "उत्तर" देऊनच जवाब देतात आमदार विजयकुमार देशमुख....

सोलापूर/ प्रतिनिधी

दहिटणे येथे आज प्रधानमंत्री आवास योजना { शहरी } अंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत १ हजार ३४८ सदनिकांच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमा प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या भाषणात जोरदार तुफानी बॅटिंग करताना आपले महायुती सरकार राज्यात अतिशय चांगले विकासात्मक प्रकल्प आणून राज्याचा सर्वांगीण विकास साधत त्याचाच हा सोलापुरातील एक भाग आहे .

शहराच्या विकासासाठी “देवाभाऊ” नेहमी पाहिजे तेवढा निधी मंजूर करून देतात. त्यामुळे शहरात विकासाकडे वेगाने वाटचाल करताना दिसून येतोय.

शहरातील मूलभूत सेवा – सुविधा सोलापूरकरांना मिळतायत.ही केवळ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यानेच साध्य झाल्याचं प्रतिपादन यावेळी आ.देशमुख यांनी यावेळी केलं.

आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले कार्यकर्त्यांमुळेच मी पाच वेळा आमदार झालो .या कार्यकर्त्यांच्या बळावर आपण निवडून आलो .याचा प्रत्यय लोकसभा ,विधानसभा अथवा सोलापूर महानगर पालिका निवडणुक असू द्या या सर्व निवडणुकीत भारतीय जनता पार्टीलाच सर्वाधिक बहुमत असते.

सद्यस्थितीत आपल्या पक्षाचे काही कार्यकर्ते नाराज आहेत त्याचे कारण असे आहे की , काही लोक कुरघोड्या करतात.कार्यकर्त्यांना त्रास देतात.हा शहर शहर उत्तरचा बालेकिल्ला आहे आजतागायत पक्षनेतृत्वाने दिलेले आदेशाचे आम्ही तंतोतंत पालन करत आलो आहोत .आणि याच पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना कुणी त्रास दिला तर हेच कार्यकर्ते उत्तर देऊनच
जवाब देतील . या तुफानी भाषणावर कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो ,देवाभाऊंचा विजय असो , विजयकुमार देशमुख मालकांचा विजय असो अशा घोषणा दिल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button