maharashtrapoliticalsocialsolapur

गेली ४० वर्षे भाजपचा झेंडा खाली न ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे शहर उत्तर मध्ये फक्त भाजपचीच सत्ता आहे :- आमदार विजयकुमार देशमुख…

सोलापूर

दहिटणे येथे आज प्रधानमंत्री आवास योजना { शहरी }  अंतर्गत म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेअंतर्गत १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते जल्लोष पूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी प्रास्ताविकात आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले शहरात बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत सोलापुरात आय टी पार्क सारखा प्रकल्प उभा राहणे काळाची गरज आहे . विविध उद्योग आणून बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागणे अपेक्षित आहे. अंकुर पंधे १३ एकरात गरिबांच्या स्वप्नातील पहिला गृह प्रकल्प उभारला त्याचाच आज पहिला टप्पा पार पडला.
याबद्दल आ. देशमुख यांनी पंधे यांचे विशेष आभार प्रकट केले.

रे नगर च्या बाबतीत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आपल्याला तुम्ही रे नगर सारखा प्रकल्प आपल्या मतदार संघात का उभारत नाही ? रे नगर सारखा प्रकल्प आपण आपल्या मतदार संघात उभारा .यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची संकल्पना आणि फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून या राज्यात या देशात प्रत्येकाला त्याचे घर मिळायला पाहिजे आपल्या स्वतः च्या घरात राहण्याचा आनंद फार मोठा असतो. आणि तो आनंद आज प्रत्येकाला मिळतोय यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या सदनिकांचे नाव राष्ट्रतेज अटल बिहारी वाजपेय गृहनिर्माण असे ठेवावे अशी मागणी आ.देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व म्हाडा कडे केली .

गेली ४० वर्षे भारतीय जनता पार्टीचा झेंडा कधी खाली न ठेवणारे पक्षाशी  एकनिष्ठ आपले मतदार आहेत. त्यामुळे शहर उत्तर हा भारतीय जनता पार्टीचाच बालेकिल्ला आहे. असे मनोगत व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button