” देवाभाऊ” यांनी दादांच्या निवेदनाची घेतली दखल सोलापुरात साकारणार “ना भूतो ,ना भविष्यतो ” आय टी पार्क…

सोलापूर/ प्रतिनिधी
राज्याचे विकासाभिमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण सदनिकांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले होते . सोलापूर विमान तळावर पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,आमदार देवेंद्र कोठे , शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी
” देवभाऊंचे ” गुलाब पुष्प देऊन सोलापूर विमान तळावर स्वागत केले .
तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापुरात जोरदार स्वागत करण्यात आले.
दरम्यान सोलापुरात बेरोजगारीचा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला असल्याने सोलापुरातील हजारो बेरोजगार तरुण नोकरीसाठी पुणे – मुंबई येथे कुटुंबियांना सोडून स्थायिक झाले आहे ही सोलापूरसाठी शोकांतिका असल्याने आजच्या युवा पिढीच्या हाताला रोजगार मिळावा आणि तो आय टी पार्क च्या रूपात अशा मागणीचे निवेदन आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १५ जुलै रोजी दिले होते .या निवेदनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेऊन सोलापुरात आय टी पार्क प्रकल्पास मंजुरी देऊन तो लवकरच साकारण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला. सोलापुरातून कुटुंबियांना सोडून नोकरीसाठी बाहेर गावी गेलेली आजची युवा पिढी सोलापुरात नक्की परतणार असल्याचे अभिवचन ” देवाभाऊ ” यांनी सोलापूरकरांना दिले .
त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरणार आहे .राज्यात महायुतीचे सरकार सक्षमपणे विविध विकास आराखड्यातून राज्याचा सर्वांगीण विकास करत असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा असल्याचे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले.
दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन आय टी पार्क प्रकल्पास सोलापुरात येऊन जाहीर घोषणा केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरकरांच्या वतीने विशेष आभार प्रकट केले …



