सराईत मोटार सायकल चोरास अटक चोरीच्या एकूण १५ मोटारसायकल हस्तगत….

पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांची बैठक घेवुन त्यांना मोटार सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणावे तसेच मालाविषयी गुन्हे घडणार नाही या करीता मालाविषयाच्या आरोपींतावर योग्य ती प्रतिबंध कारवाई करुन गुन्हे नियंत्रणात आणावेत याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सुचना देवुन आदेश दिले होते.
पोलीस अधीक्षक, अतुल कुलकर्णी यांचे आदेशा प्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधीकारी व अंमलदारांचे वेग वेगळे पथके तयार करुन गुन्हे उघडकीस आणने कामी मार्गदर्शन व सुचना दिले होते.
त्याप्रमाणे गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, विजय शिंदे व त्यांचे पथक पंढरपुर शहरात हजर असताना त्यांचा पथकास माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील मोटार सायकल चोर नामदेव बबन चुनाडे याने खडतरे गल्ली सांगोला येथील मोटार सायकल चोरली आहे. तसेच त्याने अनेक मोटार सायकली चोरल्या आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने सपोनि शिंदे व त्यांचे पथकाने नमुद आरोपी नामे नामदेव बबन चुनाडे रा. अनिल नगर, कराडकर मठा शेजारी पंढरपुर यास पंढरपूर येथून ताब्यात घेतले. त्याचेकडे चोरीच्या मोटार सायकली बाबत विचारणा केली असता, तो उडवा उडवीचे उत्तर देवु लागला. त्यावर संशय वाढल्याने त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन विचारपुस केली असता त्याने सांगोला पोलीस ठाणे गुरनं 645/2025 बीएनएस-23 चे क 303(2) या गुन्हयातील मोटार सायकल खडतरे गल्ली सांगोला येथुन चोरी केल्याचे सांगितले.
आरोपी नामदेव बबन चुनाडे याच्याकडे आणखीन सखोल विचारपुस करुन तपास करता त्याने सांगितले की, त्याने सांगोला, करमाळा, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर इत्यादी ठिकाणाहुन मोटार सायकली चोरल्याचे सांगितले. त्याचेकडुन एकुण 6,90,000/- रुपये किमतीच्या 15 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असुन, सदर मोटार सायकली बाबत गुन्हे अभीलेख पडताळणी केली असता खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जगताप, वरीष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व पथकातील अंमलदार पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड, पोलिस कर्मचारी रवि माने, सलीम बागवान, विजयकुमार भरले, धनराज गायकवाड, अश्विनी गोटे, विनायक घोरपडे, सुरज रामगुडे, मनोज राठोड, अनवर अत्तार, सतीश बुरकुल यांनी बाजवली आहे.



