अन्न औषध प्रशासनाची दोन दुकानांवर धाड कारवाईत अवैध गुटखा ,सुगंधित सुपारी , आर एम डी पान मसालाचा एकूण १ लाख ५८ हजार ५२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…
एकूण ७ जणां विरुद्ध बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

सोलापूर
अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तसेच अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी व उमेश भुसे यांच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील रिझवान रहिमान तांबोळी यांच्या स्वतः च्या मालकीच्या मे. ए.एच . ट्रेलर्स,लता टॉकीज शेजारी व किरण शंकर कल्याणी यांच्या मालकीच्या मे.गजानन ट्रेडर्स या दोन्ही पेढीवर अचानक धाड टाकली .या दोन्ही पेढीतून प्रतिबंधित अन्न पदार्थाचा बादशाह , के आर गुटखा , आर .एम . डी पान मसाला ,विमल पान मसाला ,डायरेक्टर ,सुगंधित सुपारी असा एकूण ज्याची किंमत १ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या प्रकरणी रिझवान रहिमान तांबोळी,पुरवठादार तांबोळी ,पुरवठादार शेख , पुरवठादार मिलन, किरण शंकर कल्याणी , पुरवठा दार राम डोंबे, पुरवठादार तांबोळी यांच्या विरुद्ध बार्शी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे कलम २२३ ,२७४,२७५,१२३ , आणि ३(५),अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ नुसार २६(२),२७(३),३०(२),५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी व उमेश भुसे व त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली…