crimeEpaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

मौजे बोरामणी येथे ( Rapid Action Force ) बटालियन सह रूट मार्च ( पथ संचलन )…

सोलापूर .

मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात आगामी काळात येणारे / होणारे सण, उत्सव व निवडणुक शांततेत व भयमुक्त वातावरणा मध्ये पार पाडुन सामाजिक अस्थिरता, धर्मीय किंवा जातीय संघर्ष झाले नंतर झपाटयाने कारवाई होणे करीता (Rapid Action Force) बटालियन याचे पथकासह मौजे बोरामणी गावात दिनांक 29.07.2025 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 या कालावधीत रूट मार्च (पथ संचलन) घेण्यात आले आहे.

 

सदर रूट मार्च (पथ संचलन) चे वेळी रॅपिड ऍ़क्शन फोर्स (Rapid Action Force) बटालियन हकीमपेटा सिकदराबाद तेलगंणा येथील ए. सरस्वती, सहायक पोलीस अधीक्षक, Rapid Action Force कडील 2 पोलीस उपनिरीक्षक याचेसह सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील सोमनाथ कदम, सहायक पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्षा कडील सहायक पोलीस निरीक्षक/सुधीर टेकाळे व सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक फैयाज बागवान, पोलीस हवालदार क्षीरसागर, यादव व पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील स्ट्रायिंग फोर्स मधील अंमलदार यांनी सहभाग नोंदविला आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button