
सोलापूर :
येथील सुप्रसिध्द “सिमको स्पिनर्स” या मिलमधील माजी व्यवस्थापक श्री. एम.एम. कुलकर्णी वय ६४ वर्षे, धंदा निवृत्त रा. सोलापूर यांना प्रॉव्हीडंट फंड अनियमीतता प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
याची थोडक्यात हकीकत की, २०१६-१७ या वर्षामध्ये देय असलेली प्रॉव्हीडंट फंड रक्कम रु. ६४,७९,८०५/- रुपये इतकी रक्कम न भरुन अनियमीतता केल्याप्रकरणी प्रॉव्हीडंट फंड कार्यालयाने तालुका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली होती. त्यावर तत्कालीन संचालक व व्यवस्थापक श्री. एम. एम. कुलकर्णी यांचेवर गुन्हा दाखल झाला. त्याप्रमाणे तपास चालु होता. तथापि, सदर प्रकरणात अटकेची शक्यता निर्माण झाल्याने तत्कालीन व्यवस्थापक श्री. एम. एम. कुलकर्णी यांनी अॅड. शशी कुलकर्णी यांचेमार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी सत्र न्यायालयासमोर झाली त्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला की, आरोपी हा त्या कंपनीचा नोकर आहे, झालेल्या अनियमीततेस व्यवस्थापक जबाबदार असू शकत नाही, प्रॉव्हीडेट फंडाची थकीत रक्कम संबंधीत ऑफीसला व्याजासह भरलेली आहे., आरोपी हे निवृत्त आहेत. केवळ तांत्रिकदृष्ट्या त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अटकपुर्व जामीन मंजूर करावा अशा प्रकारचा युक्तीवाद केला. त्यास सरकारी वकिल दत्ता पवार यांनी जोरदार हरकत घेतली.
दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने रक्कम रु. ५०,०००/- च्या बंधपत्रावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॅड. शशी कुलकर्णी, अॅड. स्वप्नील सरवदे, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, अॅड. आदित्य आदोणे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे अॅड. दत्ता पवार यांनी काम पाहिले…