सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या वतीने मौजे मुळेगावं तांडा येथे सेंद्रीय शेती विषयक कार्यशाळेचे आयोजन….

सोलापूर
मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे संकल्पेनेतुन सोलापूर ग्रामीण जिल्हयातील शेतकरी बांधवा करीता सेंद्रीय शेतीचा विकास करणे करीता वेगवेगळया कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने आज दिनांक 27.07.2025 रोजी मौजे मुळेगाव तांडा येथे विकसित गाव अभियान व ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर वेळी सुमारे 100 ते 150 शेतकरी बांधव उपस्थित होते.
उपस्थित शेतकरी बांधवाना श्री.प्रकाश पवार, कृषीतज्ञ, जळगांव व श्री.अभय गायकवाड, TISS विद्यार्थी यांनी मार्गदर्शन केले.
सदर वेळी सोलापूर तालुका, पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक यांनी मुळेगाव तांडा येथील नागरिकांनी अवैध दारू व्यवसाया पासुन परावृत्त होऊन रोजगारासाठी सेंद्रीय शेतीकडे वळावे त्यासाठी पोलीस प्रशासन शासनांच्या इतर विभागाशी समन्वय साधुन आवश्यक ती मदत करेल असे आश्वासन दिले.
सदर प्रसंगी मुळेगांव तांडा सरपंच श्री.विजय राठोड यांनी गावक-यांच्या वतीने मुळेगाव तांडा येथील नागरिकांना अवैध व्यवसाया पासुन परावृत्त करण्याचे आश्वासन दिले.
श्री.महेश घोडके, पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांनी कार्यशाळाच्या कार्यक्रमांची सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व श्री.जालींदर नालकुल, अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.राहुल देशपांडे, पोनि/सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणे करीता बोरामणी दुरक्षेत्रा कडील कार्यरत असलेले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री.फैयाज बागवान, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर व पोलीस नाईक अशिफ शेख व मुळेगाव तांडा येथील सरपंच श्री.विजय राठोड यांनी परिश्रम घेतले.



