अवैध बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रावर केलेल्या धडक कारवाईत रूपये ६६ लाख ५ हजार ९७ रुपयाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई….

.
सोलापूर
दि.24 (जिमाका) राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी सोलापूर शहर व जिल्हा परिसरात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केद्रावर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर, अवैध धाब्यावर व अवैध बनावट विदेशी मद्य निर्मिती केंद्रावर केलेल्या धडक कारवाईत रूपये ६६ लाख ५ हजार ९७ रुपयाचा मुद्देमाल जप्त.
राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय उपायुक्त सागर धोमकर पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०८ जुलै २०२५ व २३ जुलै २०२५ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस यांचे कार्यालयाने अकलुज ता. माळशिरस व मौजे चौभेपिंपरी ता. माढा जि. सोलापूर येथे बनावट मद्य निर्मितीचा कारखान्यावर धाड टाकुन ३० ब. लि. स्पिरीट, गोवा राज्य निर्मित १५३ ब.लि.विदेशी मद्य, ८९ ब.लि. बनावट विदेशी मद्य, विदेशी मद्याची १ हजार ३०० बनावट लेबले, १ हजार ५०० बुचे, रिकाम्या बाटल्या, तसेच बाटल्या सिल करण्याचे दोन सिलिंग मशिन व दोन दुचाकी वाहनासह एकुण ४ लाख ४ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच निरीक्षक कुडुवाडी विभाग याचे पथकाने एक इटिंगा वाहनासह १८ ब. लि. गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह ७ लाख २ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच या विभागाकडुन सदर कालवधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या हॉटेल आप्पाश्री ढाबा होटगी ता.द. सोलापूर व हॉटेल याराना ढाबा, ता. उत्तर सोलापूर या ढाब्यावर गुन्हे नोंदविण्यात आले असुन १८ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
तसेच दि. ०१ जुलै २०२५ ते २४ जुलै २०२५ या कालावधीत एकुण १९२ गुन्हे नोंद करुन १७० जणांवर कारवाई करुन राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केंद्रावर अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत ५७ हजार ७५५ ली. रसायन, ३ हजार ८९४ लि. हातभट्टी दारु, ५२० ब. लि. देशी मद्य, १६९ ब.ली. विदेशी मद्य. १२८ ब.लि. बिअर, ७९८ लि. ताडी, तसेच १६ वाहनासह एकुण ६६ लाख ५ हजार ९७ रुपयांचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सोलापूर शहर परिसरात अवैध हातभट्टी दारु व ताडी विकीवर कारवाई करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
सदर कारवाई निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन पाटील, ओ व्ही घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड तसेच दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे, श्री नागरे, सुखदेव सिद, सचिन शिंदे, श्री. कदम श्री कुदळे श्री नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री भुमकर, मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, अशोक माळी, चेतन व्हनंगुटी, देविदस चौधरी, योगेश पाटील, अनिल पांढरे, विनायक काळे, पवन उगले, कपिल स्वामी, महिला जवान शिवानी मुढे, दिपाली सलगर वाहनचालक दिपक वाघमारे व सानप, मारुती जडगे, यांनी पार पाडली.
अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी केले आहे…