महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी हाजी गौस शेख यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार….
शेतकऱ्यांना द्राक्ष लागवडीसाठी व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आर्थिक स्त्रोत वाढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करेन:- हाजी गौस शेख

सोलापूर..दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे सुपुत्र प्रगतशील द्राक्ष बागायतदार हाजी गौस शेख यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी भवन येथे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर शहर – जिल्ह्यातील आपल्या संचालक पदाचा लाभ उच्च प्रतीचे खत बियाणे औषधे द्राक्ष बागायतदार संघातून योग्य भावात होतकरू शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याल त्यासोबतच आपले मार्गदर्शन अनेक नव्या द्राक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना उमेदीचे ठरेल अशी अशा व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या..
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती हाजी गौस शेख यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी नेहमी सज्ज असेल. शेतकऱ्यांना द्राक्ष लागवडीसाठी व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आर्थिक स्त्रोत गतिमान कसा होईल याकडे मी विशेष लक्ष ठेवेन. नवीन शेतकऱ्यांना द्राक्ष उत्पन्न लागवडीसाठी प्रोत्साहित करून शासनाच्या विविध योजनांतून त्यांना सहकार्य करण्याचे काम येणाऱ्या काळात नक्कीच करेल राष्ट्रवादीने केलेला सत्कार मला काम करण्यास प्रेरणादायक ठरेल आपले मनपूर्वक आभार..
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार , कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सत्तार भाई शेख सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष अमीर शेख , दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशफाक कुरेशी , कार्याध्यक्ष मोईज मुल्ला, शाहिद शेख , नवीद शेख , सुलेमान शेख यांची उपस्थिती होती…