Super speed news:-शस्त्र घेऊन परिसरात दहशत करणारा इसम सागर ऊर्फ मनिष शैलेश बेळमकर हा एमपीडीए अन्वये स्थानबध्द…

सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, सागर ऊर्फ मनिष शैलेश बेळमकर वय-२३ वर्षे रा. ७९ कुमारस्वामी नगर, एमआयडीसी, सोलापूर हा मागील काही वर्षापासुन सातत्याने घातक शस्त्राने इच्छापुर्वक दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, जबरी चोरी, खंडणी मागणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, आगळीक करणे, धाकदपटशा करणे, दगडफेक करणे, घातक शस्त्रांनी धमकवणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे.
त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०५ दखलपात्र व ०१ अदखलपात्र गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. सागर ऊर्फ मनिष शैलेश बेळमकर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुव्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.
सागर ऊर्फ मनिष शैलेश वेळमकर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२४ मध्ये क. ११०(ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.३०/०४/२०२५ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्यास दि.०१/०५/२०२५ रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही, मा. एम. राज कुमार, मा.पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा. डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), मा. विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, प्रमोद वाघमारे, दपोनि, एमआयडीसी पोलीस ठाणे, सपोनि/तुकाराम घाडगे गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ- /८३३ विनायक संगमवार, पोहेकों/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे.