उबाठा ला झटका देत उत्तर सोलापूर तालुका प्रमुखाचा शेकडो कार्यकर्त्यासह परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश….

सोलापूर
शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या माध्यमातून राज्याचे परिवहणमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते युवासेना उत्तर सोलापूर तालुका प्रमुख कोंडी गांवचे युवानेते धनाजी भोसले, अमर भोसले, समाधान सावंत, अशोक भोसले, स्वप्नील गव्हाणे, ज्ञानेश्वर कवडे, अमर पाटील, गणेश रणदिवे, देवा पवार, तौफिक शेख, आदित्य मोरे यांच्यासह आपल्या शेकडो शिवसैनिकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, व काँग्रेस पक्षातून दक्षिण सोलापूर मधून अरुणाताई बेंजरपे यांच्यासह असंख्य महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
कोंडी गांवचे सुपुत्र असलेले धनाजी भोसले यांना नुकताच कोंडी गांवच्या प्रवेशद्वारात स्व खर्चातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा बसविल्यामुळे त्यांची खूप लोकप्रियता आहे, याचा आगामी काळात पक्षाला खूप फायदा होईल असे मत व्यक्त करण्यात आले, याप्रसंगी माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, मनोज शेजवाल, अमर पाटील, सागर पिसे,
सुजित खुर्द, समर्थ मोटे, मुबीना मुलाणी, रविना राठोड, संजय सरवदे, राजकुमार शिंदे, जयश्री पवार, पंकज वालावलकर, अनिता गवळी, नवनाथ चव्हाण, अश्विनी भोसले, पूजा चव्हाण, ब्रम्हदेव गायकवाड, रुपराणी चौहान, मनीषा नलावडे, एजाज शेख, सुनंदा साळुंके, गफूर शेख, प्रभाकर गायकवाड, अनिकेत राठोड, आकाश गजघाटे, आणप्पा सतुबर, जावेद पटेल, यांच्यासह आदी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.