बकरी ईद दिवशीच कसायांना दणका तीन गोशांची कत्तली पासून सुटका…
कासायांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करा:-सुधीर बहिरवाडे { अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव }

सोलापूर
काटी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी अज्ञात कसाही लोकांनी स्वतःच्या शेतात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गाई व बैल जर्सी जनावरे आणून ठेवल्याचे गोरक्षक लतेश हिरवे यांना गोपनीय बातमी दारा मार्फत माहिती मिळाली त्यांनी ही माहिती अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे यांना फोन द्वारे कळवली त्यांनी संबंधित पोलिसांची तात्काळ संपर्क साधून पोलीस पथकासमवेत घटनास्थळी छापा टाकला असता तेथे अनेक झाडाझुडपात बांधल्याचे दृश्य निदर्शनास पडले तर काही कसाही पोलिसांना पाहताच पळून गेले पोलिसांनी गोरक्षकाच्या मदतीने घटनास्थळी असलेल्या जनावरांची सुटका केली व पिकअप वाहनातून शिवनंदी गोशाळा येथे तात्काळ पाठवून दिले बकरी ईद दिवशीच हा प्रकार घडल्यानं गोरक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे यांनी गोरक्षणाचा कायदा कडक करण्यात यावा. अशा कत्तली करणाऱ्या कसायांवर असामीन पत्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संघर्ष युद्धा शी बोलताना केली आहे. या कारवाईसाठी धाराशिव चे पोलीस अधीक्षक ऋतू कोपर तसेच तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकूर , पोलीस उपनिरीक्षक लोंढे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
या कारवाईसाठी अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे, सोलापूर संघटक प्रसाद झेंडगे, शहर उपसंघटक लतेश हिरवे , ज्ञानराज गुंड { माऊली} , सोन्या चौधरी , राहुल साठे , ज्योतिबा मुळे, अजय साठे, गजानन गुंड , अनिकेत साठे , रुपेश बेलेराव , ओंकार माउलीकर , तसेच शिवनंदी गोशाळेचे विशेष सहकार्य लाभले.
या कारवाईबद्दल अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष रोहित बागल यांनी पोलीस प्रशासन व गोरक्षकांची विशेष आभार व्यक्त केले…