स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी पक्ष अव्वल स्थानी राहील यासाठी पराकाष्टा करा:- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन सोहळ्यास मोठ्या कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिले....

सोलापूर –
सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अव्वल स्थानी राहील यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पराकाष्टा करावी तसेच १० जून रोजी पुणे येथील बालेवाडी येथे राष्ट्रवादीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना सूचना दिल्या. दरम्यान पुणे येथील व्हीव्हिआयपी सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी भेट घेऊन मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यास सोलापुरातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणारअसल्याचे सांगितले.
सर्वसामान्य नागरिक हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधाराशी जोडला गेला पाहिजे. सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्ष बळकटीसाठी सभासद नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवावी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार आपल्याला निवडून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बळकट करायचे आहेत अशा सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिले. तसेच महायुतीच्या माध्यमातून अनेक जनकल्याणार्थ योजना राबविण्यात आले आहेत या योजना तळागाळात पोहोचवा अशा सूचना देखील यावेळी अजित पवारांनी दिल्या.
याप्रसंगी आमदार चेतन दादा तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, महादेव राठोड,आनंद गाडेकर यांच्यासह पुणे शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुणे येथील बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर होणारा हा पहिला वर्धापन दिन असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.