भारतीय जनता पार्टीचे नेते व हिंदुत्ववादी नेते उदयशंकर पाटील यांच्या निवेदनाची रेल्वे मंत्र्यांना घेतली तत्काळ दखल …
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचे प्रतीक असलेले नंदीध्वजाची काढून ठेवलेली प्रतिकृती उभारण्याचे कामास तातडीने सुरुवात...

सोलापूर
मध्य रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सोलापूर रेल्वे स्थानका मध्ये, सोलापूर नगरीचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचे वैभवशाली असे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रेचे प्रतिबिंब दर्शविणारे नंदीध्वज व नंदीध्वज धारी सिद्धारामेश्वर भक्तांची प्रतिमा ही सोलापूर रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील प्रांगणात होती.
सोलापूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या वेळी, नंदीध्वज धारी सिद्धारामेश्वर भक्तांची हि प्रतिमा स्थानकाच्या दर्शनी भागातील प्रांगणातून काढत ते जुन्या माल धक्का व महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळील आत्ताचे नवीन पार्किंग येथे हलविण्यात आले होते. या हलविण्यात आलेल्या नंदीध्वज धारी सिद्धारामेश्वर भक्तांच्या प्रतिमेचे जवळ कटढा किंवा जाळी नसल्याने व दुर्लक्षतेमुळे, घाण साचली जात होती व हि सोलापूरची मानबिंदू असलेली सुंदर प्रतिकृतीचे हेळसांड हि होताना सर्वांना हि बाब प्रकर्षाने दिसून आलें.
सदर बाब हि श्री सिद्धरामेश्वर भक्तांच्या निदर्शनात येताच त्यांनी हि बाब भारतीय जनता पक्षाचे व हिंदुत्ववादी नेते उदयशंकर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. नंदीध्वज धारी सिद्धारामेश्वर भक्तांची प्रतिमा पुन्हा एकदा सन्मानपूर्वक रेल्वे स्थानकाच्या प्रांगणात लावली जावी यासाठी श्री.उदयशंकर पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री व्ही. सोमन्ना यांच्यासमोर तमाम श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या भक्तांच्या भावनेचा हा विषय मांडला. व निवेदन दिले .
त्या निवेदनावर केंद्रीय रेल्वे मंत्री व्ही. सोमन्ना .यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखत सोलापूर रेल्वे डिव्हिजन मधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना पाचारण करत, त्वरीत या विषयी कारवाई करण्याचे व तात्काळ नंदीध्वज धारी सिद्धारामेश्वर भक्तांची प्रतिमा पुनः सन्मानपूर्वक स्थापित करण्याचे निर्देश दिले.
रेल्वे मंत्री व्ही सोमन्ना यांनी रेल्वे प्रशासनास दिलेल्या आदेशानंतर
स्थानिक पातळीवर वेगवान हालचाली दिसून येऊ लागल्या. मंगळवारी रेल्वे मंत्री ही सोमन्ना यांच्याकडून उदयशंकर पाटील यांच्या कार्यालयात सोलापूर रेल्वे डिव्हिजन मधून संपर्क साधत, नंदीध्वज धारी सिद्धारामेश्वर भक्तांची प्रतिमा सन्मानपूर्वक पुनः स्थापित करण्याचे प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहें असे कळविण्यात आलें आहें.
सोलापूर नगरीचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या तमाम भक्तांच्या आस्तेचा विषय एवढ्या गांभीर्याने हाताळत त्वरीत कारवाई केल्या बद्दल, श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या तमाम भक्तांच्या वतीने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या कुशल नेतृत्वाच्या खाली काम करीत असलेले कर्तबगार केंद्रीय रेल्वेमंत्री मा.श्री. व्ही. सोमन्ना व मध्य रेल्वे, सोलापूर रेल्वे डिव्हिजन मधील सर्व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व कृतज्ञता व्यक्त केले जात आहें.