राज्याच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीमध्ये आमदार देवेंद्र कोठेंची निवड….

सोलापूर
आज दि. ४ जून २०२५ रोजी या समितीची प्रारंभिक बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत समिती प्रमुख पदी आमदार सुहासजी कांदे यांची निवड करण्यात आली . याच समिती मध्ये सोलापूरचे विकास रत्न आमदार देवेंद्र कोठे यांचीही विशेष निवड करण्यात आली . या निवडी बद्दल विविध स्तरातून आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

या समितीच्या पुढील कामकाजाबाबत व समितीशी निगडीत विविध विषयांबाबत आज विशेष चर्चा करण्यात आली. या चर्चेत सोलापूरचे नेतृत्व म्हणून आमदार देवेंद्र कोठे यांनी सहभाग नोंदवला .

.सोलापूरातील भटक्या जाती व विमुक्त जमाती प्रवर्गात येणाऱ्या सर्वांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील . विशेषतः कैकाडी, टकारी, पामलोर, पारधी, बंजारा, धनगर, गारुडी अशा समाजातील संख्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात असून यांच्याकरिता प्रस्तावित असलेली घरकुल योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासनाकडून अशा योजनेला तत्काळ मंजुरी देऊन पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा आजच्या समितीच्या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रामुख्याने मांडला…..



