‘शासन सेवा जनतेच्या दारी ” अर्ज निपटारा मोहीमे अंतर्गत सोलापूर उपविभागातील चारही पोलीस ठाणे कडील 191 तक्रारी अर्जाचा निपटारा….

सोलापूर
ग्रामीण जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेस नागरिकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी अर्ज प्राप्त होतात. त्या तक्रारी अर्जाच्या निपटारा करणे करीता तक्रारी अर्जातील संबंधीत अर्जदार व गैरअर्जदार यांना पोलीस ठाणेस बोलावुन त्यांच्या गा-हणी ऐकुन तक्रारी अर्जाचा निपटारा करणे करीता आठवडयाच्या प्रत्येक शनिवरी ” तक्रार निवारण दिन ” साजरा करणे बाबत मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री.अतुल कुलकर्णी यांनी आदेशीत केले आहे.
त्या अनुषंगाने सोलापूर उपविभागातील कार्यरत असलेल्या सोलापूर तालुका, मोहोळ, मंद्रुप व कामती या पोलीस ठाणेस ” महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसीय सुशासन मिशन ” अंतर्गत नागरिकांच्या प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जाचा जलद व न्यायालयीन निपटरा करणे करीता मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग श्री.संकेत देवळेकर यांचे नेतृत्वाखाली चारही पोलीस ठाणेस दिनांक 12.04.2025 रोजी विशेष मोहिम राबविण्यात आली होती.
सदर विशेष मोहिमे अंतर्गत श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे, श्री.हेमंत शेंडगे, पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस ठाणे, श्री.ज्ञानेश्वर उदार,सहायक पोलीस निरीक्षक, कामती पोलीस ठाणे व श्री.मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक, मंद्रुप पोलीस ठाणे यांनी सहभाग घेतला.
सदर विशेष मोहीम अंतर्गत तक्रारी अर्जाचा निपटरा करणे करीता श्री.रेवन पाटील, विधिज्ञ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांची कायदेविषयक सल्लागार म्हणुन योगदोन दिले आहे.
राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे दरम्यान चारही पोलीस ठाणे कडील एकूण 191 तक्रारी अर्जाचे त्वरीत आणि शांततापुर्ण निपटारे करण्यात आले. त्या मध्ये जमीन, मालमत्ता वाद, कौटुबिंक तक्रारी, सार्वजनिक स्थानावरील वाद, शाळा-कॉलेज संदर्भातील समस्या आणि इतर नागरी हक्कांशी निगडीत तक्रारी अर्जाचा समावेश होता.
या उपक्रमांतुन नागरिकांच्या मनात पोलीसा विषयी विश्वास निर्माण होऊन पोलीस जनतेच्या हितासाठी काम करतात हे प्रत्यक्ष कृतीतुन अधोलिखित झाले, वाद निपटारा आणि न्यायालयाचा भार कमी-लहान वाद पोलीस स्टेशनच्या स्तरावर सोडविले असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया टळली, स्थानिक शांतता व सुव्यवस्थेस चालना-वादग्रस्त घटकामध्ये संवाद घडवुन आणुन तणावमुक्त वातावरण तयार करणेस मदत, पोलीस ठाण्याच्या विश्वासर्हतेत वाढ- तक्रारी अर्जाची निपटारा केल्यामुळे पोलीस ठाणे सेवा देणारी संस्था म्हणुन अधोरेखित, गुन्हेगारीच्या शक्तेला आळा-वादाच्या मुळातच तोडगा निघाल्याने भविष्यातील हिंसक घटनांना प्रतिबंध, युवक, महिला व वृध्दांचे प्रश्न प्राधान्याने हाताळुन सर्व घटकांचा समावेश करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न वगैरे फायदे होणार आहेत.
सोलापूर ग्रामीण पोलीसांचे हे कार्य ” जनतेच्या सेवेसाठी कार्यरत प्रशासन ” या तत्वाची साक्ष देते. पुढील 100 दिवसात अशाच उपक्रमांची साखळी राबविण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करून आपले प्रश्न उपविभागीय पोलीस ठाणे कडील संबंधीत पोलीस ठाणेस मोकळेपणाने मांडावेत असे आवाहन मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी केले आहे.
सदरचा तक्रार निवारण दिनाची विशेष मोहीम मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे नेतृत्वाखाली श्री.राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका,पोलीस ठाणे, श्री.हेमंत शेंडगे, पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस ठाणे, श्री.ज्ञानेश्वर उदार, सहायक पोलीस निरीक्षक, कामती पोलीस ठाणे व श्री.मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक, मंद्रुप पोलीस ठाणे व सर्व संबंधीत पोलीस ठाणे कडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राबविली आहे.