crimemaharashtrapoliticalsocialsolapur

चार्टर्ड अकाऊटंटच्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर:-अॅड. गुरुदत्त बोरगांवकर…

सोलापूर

 

पुणे येथील रहिवासी अनिल बाबुराव इरवडे, वय-३९वर्षे, रा. मनोमन सोसायटी, नवी सांगवी, पुणे याची सोलापूर येथील ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट वर्ग-१ श्री.एन.ए.मोर यांनी चार्टर्ड अकाऊटंट यांची शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन फसवणूक केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला.

 

 

याची थोडक्यात हकीकत अशी की, चार्टर्ड अकाऊटंट अनिल गोविंद श्रीगोंदेकर यांनी दि.२४/१०/२०२५ रोजी सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथे त्यांची शेअर मार्केटमध्ये चांगला नफा मिळवून देतो असे सांगून त्यांचेकडून वेळोवेळी विविध खात्यांवर रक्कम रुपये २,२८,११,०००/-(अक्षरी दोन कोटी अठ्ठावीस लाख अकरा हजार रुपये) भरण्यास सांगितले.

 

 

त्यानंतर सदर गुंतवणूक रकमेवर एकूण २६,०६,०९,२९२/- (सव्वीस कोटी सहा लाख नऊ हजार दोनशे ब्याण्णव) नफा झाल्याचे भासवले, त्यावेळी फिर्यादीने सदर नफ्यातील २,००,००,००० (दोन कोटी रुपये) काढण्याची विनंती केली असता, त्यावर गुंतवणूकदार कंपनीकडून कमीशन म्हणून रक्कम रुपये ७१,००,०००/- मागणी केली, त्यावेळी फिर्यादीस त्यांची सदर कंपनीकडून ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे फिर्यादीने सोलापूर सायबर पोलीस स्टेशन येथे अनोळखी इसमांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. सदर फिर्यादीच्या अनुषंगाने सोलापूर सायबर पोलीसांनी सखोल तपास करुन आरोपींना अटक केली होती.

 

 

आरोपीने सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टासमोर जामीन अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालेले आहे, तपासपूर्ण झालेला आहे, त्यामुळे आरोपीस जामीन देण्यास कोणतीही हरकत नाही. असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला तसेच त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले, सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन मे. कोर्टाने आरोपीस जामीनावर सोडण्याचा आदेश पारीत केला.

 

 

या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. गुरुदत्त बोरगांवकर, अॅड. देवदत्त बोरगांवकर, अॅड. शिवानी करवा, अॅड. निकिता कुलकर्णी, अॅड. उमाश्री कोळी व सरकारतर्फे अॅड. पाटील यांनी काम पाहिले...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button