कोयत्याने खुनी हल्ला प्रकरणी दोघांना अटकपूर्व मंजूर:- अँड. संतोष न्हावकर…

सोलापूर
चौघांनी मिळून कोयत्याने खुनी हल्ला करून डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेश कृष्णा श्रीराम व विशाल श्रीराम या दोघांना अटकपूर्व जामीनावर मुक्त करण्याचे आदेश सत्र न्यायालय सोलापूर यांनी दिले.
यात हकीकत अशी कि, दि. १५/११/२०२५ रोजी सकाळी ०९:३० वा.च्या सुमारास फिर्यादीचा भाऊ नामे राहुल अण्णारेड्डी व भाचा रवि अर्जुन संगा लिमयेवाडी चौकातील काका महाराष्ट्र चिकन सेंटर येथे चिकन आणण्यासाठी गेले होते. त्यानंतर लागलीच भाचा रवि यांनी फोन करुन त्यांना कळविले कि मी व राहुल मामा महाराष्ट्र चिकन शॉप येथे चिकन घेत असताना ओळखीचे इसम नामे १) सुरेश कृष्णा श्रीराम, २) प्रदीप गायकवाड, ३) विशाल श्रीराम, ४) प्रज्वल गायकवाड हे सदर ठिकाणी येवुन तु मागच्या वेळी केलेली केस माघारी घेतो का नाही असे म्हणुन शिवीगाळी करू लागले.आम्ही त्यांना विरोध करत असताना प्रदीप गायकवाड यांनी त्याच्या जवळ लपवुन आणलेला कोयता काढून तु केस घेणार नाहीस तर तुला आता खल्लास करुन टाकतो असे म्हणुन राहुल मामाच्या डोक्यात मारले. तेव्हा त्यांच्या डोक्याला मार लागुन रक्त येत होते व इतर जण राहुल मामाला हाताने मारहाण करुन शिवीगाळी करत होते.
तेव्हा सदर ठिकाणी असलेले महाराष्ट्र चिकन दुकानातील इसम नामे रमजान फारुख बेपारी व मी मिळुन राहुल यास दुकानात आतमध्ये ओढून घेवुन दुकानाचे शटर लावुन घेतले. त्यावेळी ते सर्वजण सार्वजनिक ठिकाणी हातात कोयते घेवुन कोणी मध्ये आले तर त्यालापण खल्लास करतो असे आरडाओरड करुन सार्वजनिक रोडवर दहशत निर्माण केली त्यावेळी आजुबाजुचे लोक त्यांना पाहुन पळुन गेले तसेच दुकान दाराने त्यांना घाबरुन त्याच्या दुकानाचे शटर लावुन घेतले त्यावर ते चौघेजण तेथे आरडा ओरड करुन निघुन गेले. फिर्यादी लागलीच सदर ठिकाणी जावुन त्यांच्या भावाला पाहिले असता त्यांच्या भावाच्या डोक्यात मार लागुन खुप रक्त येत होते. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्या भाच्याच्या मदतीने भावाला उपचाराकरीता सिव्हील हॉस्पिटल, सोलापूर येथे अॅडमिट केले. अशा आशयाची फिर्याद रोहित आण्णारेड्डी याने सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.
दोघा आरोपींनी अँड संतोष न्हावकर यांचेमार्फत अटकपूर्व जामीन मंजूर होऊन मिळणेसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
आरोपीतर्फे युक्तिवाद करताना अँड. संतोष न्हावकर यांनी घटनेवेळी आरोपी निलमनगर येथील मंदिरात पूजा करत होता हे दर्शवणारी चित्रफीत सादर करून आरोपी निष्पाप असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्तींनी आरोपींना प्रत्येकी 50000/- चा जातमुचलका व जामिनावर मुक्त करणेचा आदेश दिला.
यात आरोपीतर्फे अँड. संतोष न्हावकर, अँड. धनंजय येमूल यांनी तर सरकारतर्फे अँड. दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.



