श्री गणेश जयंतीनिमित्त विविध मंडळांच्या गणरायाचे सौ. उत्तरा दीदी बरडे–बचुटे यांनी घेतले मनोभावे दर्शन…

सोलापूर
श्री गणेश जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक ०७ मधील विविध श्री गणेश मंडळांना भेटी देत सौ. उत्तरा दीदी बरडे–बचुटे यांनी श्री गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधत श्री गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

दशभुजा गणपती सार्वजनिक मंडळ, बाळीवेस, श्री मल्लिकार्जुन गणेश मंडळ, कुंभारवाडा, श्री अय्या गणपती वडार गल्ली बाळीवेस, श्री वीर गणपती रो-हाऊस, राजे गणपती, वसंत विहार, अवंती नगर गणेशोत्सव मंडळ आदींसह विविध श्री गणेशोत्सव मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान संबंधित मंडळांच्या वतीने सौ. उत्तरा दीदी बरडे–बचुटे यांचा सन्मान करण्यात करीत आदरातिथ्य करण्यात आले.

मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारानंतर पुन्हा एकदा प्रभागातील विविध मंडळांच्या माध्यमातून अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांची भेट झाल्याने सर्वांशी आपुलकीने संवाद साधता आला. सर्वांनी दाखवलेले प्रेम व सन्मान पाहून मनापासून समाधान वाटल्याची भावना यावेळी दीदींनी व्यक्त केली.

यावेळी अर्चना वहिनी बरडे, आशुतोष भैय्या बरडे, रविकांत गायकवाड, अर्जुन बरडे, संदीप भोसले, संभाजी कोडगे, ओंकार सुतार, राकेश शिंदे, राहुल बचुटे, अमर पवार, अजय बोंदारडे आदी मान्यवर उपस्थित होते.




