हत्तूर पंचायत समिती गणातून बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

सोलापूर
जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यात उमेदवारीसाठी प्रचंड रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दक्षिण पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण असल्याने त्यासाठी पंचायत समिती कडे सुद्धा ओढा वाढला आहे.
दक्षिण सोलापूरचे नेते, बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांचा जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जमाती साठी राखीव झाल्याने आणि वळसंग सोडून दुसरा मतदारसंघ नसल्याने ते पंचायत समितीसाठी इच्छुक असून त्यांनी मंगळवारी हत्तूर पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
हत्तूर जिल्हा परिषद गटातून माजी सभापती इंदुमती अलगोंडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोबतीला सुरेश हसापुरे हे असल्याने हे दोन्ही नेत्यांच्या पक्ष कोणता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



