सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाचा गौरव; ३६ गंभीर गुन्हे उघडकीस, १ कोटी ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर | प्रतिनिधी
आज दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या वार्षिक गुन्हे आढावा बैठकीत सोलापूर शहर पोलीस आयुक्त मा. एम. राजकुमार यांच्या हस्ते सन २०२५ मध्ये उत्कृष्ट गुन्हे शोध व मालमत्ता हस्तगत केल्याबद्दल गुन्हे शाखेच्या पथकास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सन २०२५ या वर्षामध्ये या पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण १ कोटी ६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, महत्त्वाचे व गंभीर स्वरूपाचे तब्बल ३६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या यशस्वी कामगिरीमुळे सोलापूर शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या उल्लेखनीय यशाचे श्रेय पोलीस उपायुक्त (गुन्हे) अश्विनी पाटील मॅडम,सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने सर
आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अरविंद माने सर
यांच्या सक्षम मार्गदर्शनासह पथकाने केलेल्या अविरत मेहनत, शिस्तबद्ध कामकाज आणि उत्कृष्ट टीमवर्कला दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कामगिरीत पुढील अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली —
API शैलेश खेडकर
HC संदीप जावळे
HC विनोद रजपूत
PC इम्रान जमादार
PC राजकुमार पवार
PC उमेश पवार
सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे हे योगदान निश्चितच प्रेरणादायी असून, भविष्यातही अशीच प्रभावी कामगिरी करण्याचा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



