सोलापूर शहराला वेळेवर आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा:एमआयएमची मागणी…
दुहेरी पाईपलाईनचा नागरिकांना लाभ कधी मिळणार:एमआयएमचा सवाल...

सोलापूर:
सोलापूर हे कामगारांचे, गोरगरिबांचे, विडी कामगारांचे शहर आहे. येथे मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय नागरिक राहतात. अनेक वर्षांपासून सोलापूर मधील नागरीक खडतर आयुष्य जगत आहेत.सोलापूर महापालिकेमार्फत विविध माध्यमांतून नागरिकांना आश्वासन दिले जात आहे. “सोलापूरकरांना दोन दिवस आड पाणी मिळणार .” मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की हे आश्वासन वर्षानुवर्षे फसवे ठरत आहे. आजही सोलापूरकरांना रात्री उशिरा अथवा अनियमित पाणी मिळत आहे.एमआयएम पक्षाच्या वतीने या प्रमुख मागण्यां करत वेळोवेळी निवेदन देत आले आहे.अद्यापपर्यंत नागरिकांना महानगरपालिकेकडून आश्वासनांची पूर्तता झाली नाही.मंगळवारी सायंकाळी एमआयएम पक्षाच्या वतीने फारूक शाब्दी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महापालिका दरवर्षी टॅक्स आकारते, नागरिक जबाबदारीने तो भरतात, मात्र त्यांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो ही खेदाची बाब आहे.सोलापुरात दुहेरी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आलेली असूनही, तिचा नागरिकांना अपेक्षित लाभ होताना दिसत नाही. पावसाळ्याचे दिवस लवकर सुरू झाले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी अधिक वाढणार आहे. अशा स्थितीत नियोजनपूर्वक आणि त्वरित उपाययोजना आवश्यक आहेत.
फारूक शाब्दी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयएम पक्षाने प्रमुख मागण्या केल्या आहेत. सोलापूर शहराला नियमित आणि वेळेवर पाणीपुरवठा करण्यात यावा.दुहेरी पाणीपुरवठा योजनेचा प्रभावी उपयोग करण्यात यावा.नागरिकांना आठवड्यातून कमीतकमी 3 वेळा पूर्ण दाबाने आणि वेळेत पाणी देण्यात यावे.योजनेबाबत पारदर्शक माहिती प्रसिद्ध करण्यात यावी.ज्याठिकाणी पाणी वेळेवर पोहोचत नाही, तेथे विशेष उपाययोजना त्वरित कराव्यात.
महानगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदन देताना नगरसेवक अहजर हुंडेकरी, वाहेदा भंडाले,शौकत पठाण, तोफिक हत्तुरे, इलियास शेख, नदीम डोणगावकर, इजाज कोरबू, सादिक नदाफ, एजाज बागवान अयाज दिना पक्षाचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते