crimemaharashtrapoliticalsocialsolapur

भीमा नदीच्या पुरात गुरसाळे येथील महादेव मंदिरात अडकलेल्या तीन व्यक्तींची सुखरूप सुटका….

गुरसाळे येथील रेस्क्यू ऑपरेशन, तीन व्यक्तींना जीवनदान...

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले व तहसीलदार सचिन लंगुटे यांची प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले

 

सोलापूर

 

, दिनांक 27(जिमाका):- गुरसाळे येथील चार नागरिक भीमा नदीच्या पात्राजवळ असलेल्या महादेव मंदिरात दिनांक 25 मे 2025 रोजी रात्री दर्शनासाठी गेलेले होते. पुराच्या पाण्याची पातळी वाढत असणे त्यातील एक व्यक्ती रात्रीच बाहेर पडला परंतु इतर तीन व्यक्ती पैकी साधू यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना चालता येत नव्हते त्यामुळे ते रात्री मंदिराच्या बाहेर पडू शकले नाहीत. व सकाळी भीमा नदीला मोठा पूर आल्याने ते मंदिरात अडकले. याची माहिती मंदिरात अडकलेल्या व्यक्तींनी गुरसाळे गावचे सरपंच यांना मोबाईल फोन द्वारे दिली त्यानंतर सरपंच यांनी तहसीलदार सचिन लंगुटे यांच्याशी संपर्क साधला व या तीन व्यक्तींना तात्काळ रेस्क्यू करण्याची मागणी केली.
त्यानंतर तहसीलदार सचिन लंगुटे यांनी मंडळ अधिकारी मार्फत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्याशी संपर्क साधला व तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या समन्वयातून सकाळी साडेसात नंतर गुरसाळे येथे महादेव मंदिरात भीमा नदीच्या पुरात अडकलेल्या तीन नागरिक व एका कुत्र्याच्या पिल्लासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले.

 

 

 

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे असलेली अद्यावत बोटीमध्ये स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे चार प्रशिक्षित पोहणारे स्वयंसेवक तसेच स्थानिक पोलीस विभागाचा आपत्ती व्यवस्थापन चे प्रशिक्षण दिलेले पोलीस कर्मचारी अमित गवळी यांना घेऊन श्री ढोले हे गुरसाळे येथील गावात पोहोचले. तहसीलदार सचिन लंगुटे ही गावामध्ये पोहोचले.
त्यानंतर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी समन्वयातून संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचे कागदावर डिझाईन तयार केले ते डिझाईन बचाव पथकातील स्वयंसेवक तसेच पोलीस कर्मचारी यांना समजावून सांगण्यात आले त्याप्रमाणे बोट चालकांनी त्या पद्धतीने बोट मंदिर परिसरात घेऊन गेले व स्वयंसेवक व पोलीस कर्मचारी यांनी मंदिरातील एक साधू दोन अन्य व्यक्ती व एक कुत्र्याचे पिल्लू यांचे अत्यंत सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुखरूप जागी आणले.

 

 

 

 

यावेळी पोराच्या पाण्यात अडकलेले साधू व अन्य दोन व्यक्ती यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करून पुरातून बाहेर काढल्याबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले. या प्रकारे सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्ह्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व अद्यावत साहित्य सह व प्रशिक्षित मनुष्यबळासह सज्ज असल्याचे हे द्योतकच आहे.

 

 

 

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांच्या नियंत्रणाखाली माळशिरस तालुक्यातील कुरबावी व पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे राबवून दहा व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button