
सोलापूर
या प्रकरणात थोडक्यात हकीकत अशी की,यातील इसम नाव नरसिंग राजय्या आगबत्तीन, वय 58 वर्षे, रा. 57-ब, पोशम्मा मंदिराजवळ, भगतसिंग चौक, शास्त्री नगर, सोलापूर पोशम्मा देवी मंदीराचे बाजुस, भगतसिंग चौक, शास्त्री नगर, सोलापूर इसम नामे गणेशकुमार पाटील, रा. सोलापूर याचे सांगण्यावरुन व चिथावणी दिले वरून येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन त्या पैशांवर अंक व आकड्यांवर पैज लावुन, कल्याण नायात्रा बेकायदेशीर मटका जुगार खेळवत असताना मिळून आला आहे.
त्यामुळे यातील फिर्यादी गुन्हे शाखेचे पोलिस शिपाई वसीम इसाक शेख वय ३६ वर्षे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नरसिंग राजय्या आगबत्तीन याच्यावर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( अ ) नुसार भारतीय न्याय संहिता कलम ४९ नुसार गुन्हाn दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी मटका जुगारासाठी लागणारे गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य हस्तगत केले…
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दोरगे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी पणे पार पाडली.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार इनामदार हे करीत आहेत ..