आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास अटक करून, घरफोडीचे ०२ गुन्हे उघडकीस आणुन, १,९३,३५०/- रू. किंमतीचा मुद्देमाल केला जप्त गुन्हे शाखेची दमदार कामगिरी…

सोलापूर शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेचे अनुषंगाने, गुन्हे शाखेकडील सपोनि/संदीप पाटील व त्यांचे तपास पथक प्रयत्नशील होते. नमूद पथकाने, दिवसा घरफोडी चोरी करणारा पर-जिल्ह्यातील, रेकॉर्ड वरील आरोपी नामे सॅमसन रूबेन डॅनियल, वय-२६ वर्षे, रा. डॅनिअल हाऊस, रूम नं-५, बेतुरकरपाडा क्वालिटी कंपनी जवळ, कल्याण वेस्ट, कल्याण, ठाणे यास दि.१९/१२/२०२४ रोजी अटक केली. नमूद आरोपीकडे स.पो.नि./संदिप पाटील व त्यांचे तपास पथकाने कौशल्यपुर्वक तपास केला असता, नमूद आरोपीकडून खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले असून, नमूद प्रमाणे मालमत्ता हस्तगत केली आहे.
अशा प्रकारे, शहर गुन्हे शाखेकडून, वरील प्रमाणे ०२ घरफोडी चोरी गुन्ह्यातील एकुण ४८.१३ ग्रॅम सोने व ३४ ग्रॅम चांदी, १०,०००/- रू. किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण रू.१,९३,३५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा, दिवसा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून, तो ठाणे येथे राहणारा आहे. त्याचेविरूध्द, सोलापूर शहर तसेच महाराष्ट्रा राज्यातील ठाणे, रत्नागिरी, सांगली, जळगांव, तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यात देखील दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी, मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे/वि.शा., श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./संदिप पाटील, व पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, निलोफर तांबोळी, गणेश शिंदे, चालक सतिश काटे, फरदिन शेख, सायबर पोलीस ठाणे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड, यांनी केली आहे…