विष्णू घाट मुख्यद्वार येथील सार्वजनिक शौचालय तत्काळ पाडून कायम स्वरुपी बंद करण्या बाबत डॉ.किरण देशमुख यांचे पालिका आयुक्तांना निवेदन….

सोलापूर
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान मंदिरच्या ईशान्य दिशेकडील विष्णू घाट मुख्यद्वार लगत सार्वजनिक शौचालय असून या शौचालयामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.तसेच विष्णू घाट येथे सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन होते.या तलावात शौचालयाचे सुरु घाण पाणी मिश्रित होत आहे.त्यामुळे या पवित्राचा भंग होत आहे. सोलापूरकरांचा या शौचालयास तीव्र विरोध आहे .त्यामुळे हे शौचालय तत्काळ पाडून ते इतरत्र स्थलांतर करण्यात यावे .
अन्यथा भविष्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कडून आंदोलन येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक डॉ.किरण देशमुख यांनी पालिका आयुक्तांना निवेदना द्वारे दिला आहे.
हे निवेदन देतेवेळी युवा मोर्चाचे माजी नगरसेवक नागेश भोगडे,वैभव हत्तुरे, सरचिटणीस रवी कोटमळे,अजित गादेकर, सिद्धार्थ मंजेली,नागेश येळमेळी,शिवराज झुंजे,प्रेम भोगडे,नरेंद्र पिसे,राहुल घोडके, शिवशरण साखरे, अक्षय अंजीखाने, हरिप्रसाद बंडेवार, शशी अन्नलदास भार्गव बच्चू, यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…