crimemaharashtrapoliticalsocialsolapur

करमाळा पोलीस ठाणे हद्वीत कुंटणखाना / वेशा व्यवसाय चालविणारे इसमावर कारवाई करुन तीन पीडीत महीलांची सुटका….

दि. ०४/०५/२०२५ रोजी पो.नि./ रणजीत माने यांना गोपणीय माहीती मीळाळी की, मौजे विटगावचे शिवारात एक इसम अवैध कुंठण खाना चालवित आहे, अशी गोपणीय माहीती प्राप्त होताच त्यांनी सदर बाबत छापा कारवाई करणे करीता मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री अजित पाटील साहेब. करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहीती देवून छापाकारवाई करीता अधिकारपत्र घेवून छापाकारवाई करणे करीता, म.स.पो.नि./म्हस्के, पो.उप. निरी./ चंदनशिव, स.पो.उप.निरी. / शिनगारे, पो.हवा./१५० लोहार, पो. हे. कॉ/१३० महेश डोंगरे, पो.शि./२१४० शिंदे, पो.शि./१७४८ घोगडे, म.पो.शि./१६६ पारधी, सर्व नेमः करमाळा पोलीस ठाणे याना बोलावून सांगितले की, गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की, करमाळा पोलीस ठाणे ह‌द्दीमधील हॉटेल साईलीलाचे पाठीमागे पाझर तलावाजवळ, मौजे वीट, ता. करमाळा या ठिकाणी एक इसम काही महीलांना डांबुन ठंयुन त्यांचेकडुन अनाधिकृतपणे जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेत आहे अशी बातमी मिळाली आहे.

 

 

त्या ठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवुन पंचांसमक्ष छापा कारवाई करावयाची आहे. असे सांगुन मागदर्शन करून, दोन पंच व बनावट गिऱ्हाईक सह व साहीत्यासह, शासकिय वाहनाने कारवाईसाठी ००:१४ वा. रवाना होवून, वीट येथील पाझर तलावाचे जवळ असलेल्या साईलीला हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या खोलीमध्ये जावुन छापा कारवाई करुन तेथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची ताबेत घेतले आहे त्या

 

 

 

नंतर नमुद ठिकाणी मिळुन आलेला इसम नामे संतोष रोहीदास जगदाळे, वयः ४१ वर्षे रा. वीट, ता. करमाळा याचेकडे पोलीसांनी पंचासमक्ष विचारणा केली असता नमुद शेड हे त्याच्या मालकीचे शेतात बांधलेले असुन त्यामध्ये तो नमुद महीलांकरवी वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक गिऱ्हाईकामागे त्यास ५००/- रुपये मिळतात असेही त्याने सांगीतले. त्यामुळे इसम नामे संतोष रोहीदास जगदाळे, वयः ४१ वर्षे रा. वीट, ता. करमाळा हा इसम वेश्याव्यवसायासाठी महीला पुरवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे विरुद्ध पो.हे.कॉ/ १३७० महेश हंबीराव डोंगरे यांने फिर्याद दिल्याचे संतोष रोहीदास जगदाळे, वयः ४१ वर्षे रा. वीट, ता. करमाळा याचे विरुद्ध भा.न्या.सं. कलम १४३(२), १४४(२), सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५,६ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आले नंतर सदर आरोपीस रितसर अटक करुन मे. कोर्ट बार्शी यांचे समक्ष हजर केले असता त्यास दिनांक ०७/५//२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे

 

 

 

, सदर गुन्हयाचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने हे करीत आहेत, तसेच पिडीत महीला यांना मे. कोर्ट बार्शी येथे हजर करून, त्यांचे आदेशा प्रमाणे त्यांना रेणुका माता शासकीय महिला आश्रम होडगी रोड सोलापुर येथे सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. / रणजीत माने, स.पो.नि./ पोपट टिळेकर, म.स.पो.नि./ म्हस्के, पो.उप. निरी. चंदनशिव, स.पो.उप.निरी./ शिनगारे, पो. हवा./१५० लोहार, पो.हे. कॉ/१३० महेश डोंगरे, पो. शि./२१४० शिंदे, पो.शि./१७४८ घोगडे, म.पो.शि. /१६६ पारधी, पो.हवा./अजित उबाळे, पो.ना./११६२ मनिष पवार, पो.ना./९१२ वैभव ठेंगल, पो.शि. /१५५० तौफिक काझी, पो.शि./१७४८ ज्ञानेश्वर घोगडे, पो.शि./११४३ सोमनाथ जगताप, पो.शि. /८५६ अर्जुन गोसावी, पो.शि./२१४२ गणेश शिंदे, पो.शि./६८९ योगेश येवले, पो.शि./४३८ रविराज गटकुळ, पो.शि./१५२४ अमोल रंदील, म.पो.ना./१३१ शितल नाव्हकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button