आयोजित ” भव्य जनता दरबार ” च्या माध्यमातून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तातडीने मार्गी लावल्या नागरिकांच्या प्रलंबित अडी – अडचणी…

श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या कल्पनेतुन सोलापूर ग्रामीण घटकाअंतर्गत येणा-या नागरिकांचे तक्रारांचे निराकरण करण्याकरीता “जनता दरबार-तक्रार निवारण दिन” आयोजित करण्यात आले होते.
या दरम्यान पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील “अलंकार हॉल” पोलीस मुख्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. सकाळी १०.०० वा. ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत ग्रामीण भागातील तक्रारदार यांची समक्ष भेट घेण्याकरीता श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा.श्री. प्रित्तम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक हे स्वतः उपस्थित होते.
त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील श्री. संकेत देवळेकर एस.डी.पी.ओ. सोलापूर उपविभाग, श्री. जालिंदर नालकुल एस.डी.पी.ओ. बार्शी उपविभाग, श्री. विक्रम गायकवाड एस.डी.पी.ओ. मंगळवेढा उपविभाग असे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच आलेल्या तक्रारदार यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी अॅड. श्री. शिवकैलास झुरळे, उपमुख्य लोकअभिरक्षक विधीसेवा प्राधिकरण सोलापूर हे देखील हजर होते.
जनता दरबार तक्रार निवारण दिन दरम्यान जिल्हयातील सुमारे ११० नागरिकांनी आपल्या समस्या पोलीस अधिकारी यांच्या समोर मांडल्या. त्यावेळी त्यांना श्री. अतुल वि. कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा.श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक यांनी स्वतः यांनी कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांच्या तक्रारीचे समाधान केले.
तसेच ज्यांच्या तक्रारीवर पोलीस खात्याकडून दखल घेणे आवश्यक आहे अशा तक्रारी तात्काळ संबंधीत पोलीस ठाणेकडे वर्ग करून दोन दिवसात त्यावर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तसेच जवळपास १३६ तक्रारी अर्जावरती कारवाई करुन निर्गती केली आहे.