जयकुमार गोरे सोलापूरचे नवे पालकमंत्री …

सोलापूर
राज्यात महायुतीच्या सत्ता स्थापने नंतर राज्यात विविध ठिकाणी पालकमंत्री पदासाठी विशेष उत्सुकता लागून राहिली होती . शनिवारी शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी या बाबत परिपत्रक काढत पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली .यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली चे ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे पुणे व बीड चे तर एकनाथ शिंदे हे मुंबई व ठाण्याचे पालकमंत्री असल्याचा समावेश आहे .तर सोलापुरात महायुतीच्या रस्सीखेच मध्ये मालक ,बापू का दादा यामध्ये नंबर मारला तो राज्याचे सध्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी.सोलापूरच्या पालकमंत्री पदी जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर चे पालकमंत्री होते .सोलापूर जिल्ह्याला प्रथमच युथ आयकॉन चेहरा जयकुमार गोरे यांच्या रूपात मिळाल्याने सोलापूरकरांना गोरे यांच्या कडून विकासाच्या दृष्टीकोनातून विशेष अशी अपेक्षा आहे.या निवड प्रक्रियेबद्दल विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी ,सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी , शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील पालकमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे