ब्रेकिंग:- शुक्रवारी केंगाव ते सोलापूर येथे झालेल्या अपघात प्रकरणातील आरोपी वाहन चालकावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
आरोपी घटना स्थळा वरुन पसार पोलीसांकडून शोध सुरू...
सोलापूर
शुक्रवार दिनांक १७/०१/२०२४ रोजी सकाळी ९:३० वा.सुमारास फिर्यादी गुलाब अल्लाउद्दीन कोरबु यांचा मोठा भाऊ अमीन अल्लाउद्दीन कोरबु वय ३२ वर्षे व्यवसाय मजुरी रा. मु. पो. कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर सध्या केगाव येथील बागवान यांच्या शेतामध्ये राहण्यास असून तो त्याच्या स्वत:च्या मोटार सायकल वाहन क्रमांक MH 13 DC 4248 वरून केगावं ते सोलापूर असे कामानिमित्त पुणे सोलापूर हायवे रोडने जात असताना MIT कॉलेज जवळील रोडवर पाठीमागून येणारी कंटेनर वाहन क्रमांक NL 01 AH0639 च्या वाहन चालकाने गाडी भरधाव वेगाने चालवून मोटार सायकल धडक दिल्याने या घटनेत दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याने व जबर मार लागल्याने दुचाकी स्वाराचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिसांनी वाहनचालक विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 281,106 मोवकाक 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त विभाग १ , फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक दराडे, सहायक पोलिस निरीक्षक खंडागळे, पाटील , पोलीस हवालदार गायकवाड यांनी घटना स्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला . घटना स्थळावरून वाहनचालकाने पळ काढला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध जलदगतीने घेण्यात येतोय ….