उपमुख्यमंत्री अजितदादा सर्व समाज घटकांना न्याय देणारे नेतृत्व – आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक उत्साहात संपन्न...

अनेक पक्षाच्या साठहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी याच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार इद्रीसभाई नाईकवाडी हे संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सर्व जिल्ह्यात जाऊन तेथे अल्पसंख्यांकांच्या अडचणी जाणून घेऊन आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे नियोजित केले आहे त्याच अनुषंगाने आज ते सर्व प्रथम सोलापूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर अल्पसंख्यांक नेते बाबा भाई सालार तसेच सोलापूर शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे यांनी संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन केले होते ..
अतिशय उत्साहात जल्लोषात अल्पसंख्यांक विभागाचा ही आढावा बैठक नई जिंदगी येथील मरहबा फंक्शन हाॅल येथे संपन्न झाली .
प्रथम आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी यांचे स्वागत करण्यात आले त्यांचा सत्कार करण्यात आला ..
उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व फ्रंटल सेलच्या माध्यमातून संघटन मजबूत करीत आहे तरी आजच्या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहील्या बद्दल आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी यांचे पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत असून अल्पसंख्यांक विभागाचे सोलापूरातील काम अतिशय उत्कृष्ट असून राष्ट्रीय नेते अजितदादा यांच्यावर विश्वास ठेवून अनेक पक्षाचे साठहून अधिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत करतो असे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आपल्या मनोगत व्यक्त करीत बाबा सालार तसेच अमीर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे यांच्या कामाचे कौतुक केले पक्ष म्हणून निश्चितच आम्ही त्याच्या सोबत असून अल्पसंख्यांक विभागाने अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत त्यांच्या पुढील कार्यास देखील शुभेच्छा दिल्या …
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातून अल्पसंख्यांक आढावा बैठकीचे सत्र सुरू असून ही पहिलीच बैठक अतिशय उत्साहात जल्लोषात पार पडली त्याबद्दल आयोजक बाबा सालार अमीर शेख संजीव मोरे यांचे अभिनंदन करतो अल्पसंख्यांकांचे प्रश्न शासन स्तरावर सोडवणूक समाजाचा विकास करून सामाजिक समतोल साधण्यासाठी मी राज्यभर दौरा करीत असून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेतृत्व अजितदादा पवार यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अल्पसंख्यांक समाजातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी साथ द्यावी असे आवाहन आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी यांनी केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्यांक महाराष्ट्र कार्यध्यक्ष मुबीन सिद्धीकी, अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख ताहेर बेग
जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले
अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष आमिर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष संजीव मोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नजिर इनामदार ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल फुलारी, अल्पसंख्याक राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके, अल्पसंख्यांक महाराष्ट्र महिला पदाधिकारी सायरा शेख, ओबीसी सेल कार्याध्यक्ष शेख, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजू सांगळे, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार, दक्षिण विधानसभा अध्यक्ष,अशपाक कुरेशी, उत्तर विधानसभा अध्यक्ष नवाज शेख, अल्पसंख्यांक जनरल सेक्रेटरी मूव्हीज मुल्ला, अल्पसंख्यांक शहर पक्ष संघटक जहीर शेख, शहर उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने, इस्माईल शेख, (बब्बू पैलवान) शेख,याकूब नवगिरे, सचिन पारवे सर, प्रकाश चंद्रकर, हणूकमिंगे, प्रकाश शिंदे, मुसेब शेख, ऍड, सलीम नदाफ, डेव्हिड खुराडे, रियाज अत्तार.