बंदुकीचा व तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोन इसमाच्या करमाळा पोलिसांनी आवळल्या मुसक्या ….
एक स्कॉर्पिओ ,एक बंदूक ,एक रिकामी पुंगळी,एक तलवार हस्तगत...

दि. २८/०४/२०२५ रोजी सकाळी ११/१५ वा. चे सुमारास कॅनॉलजवळ शेटफळ गावाचे हद्दीत व दि.२९/०४/२०२५ रोजी दुपारी १२:३० वा. चे सुमारास माने वस्ती, वांगी नं. १, ता. करमाळा, जि सोलापुर येथे आरोपी नामे :- १) जयर्वधन उर्फ मुन्ना हनुमंत दैन, वय २५ वर्षे, रा. वांगी नंबर १, ता. करमाळा, जि. सोलापूर २) प्रदीप मुकंद पोळ, वय २१ वर्षे, रा.शेटफळ, ता. करमाळा, जि सोलापुर यांनी फिर्यादी नामे अभयसिंह बाळासाहेब देशमुख, वय २८ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. वांगी नं. १, ता. करमाळा, जि. सोलापूर, मो.नं. ९९२२४५१००५ यांचे चुलतभाऊ संकेत सुहास देशमुख व फि॥चा मावसभाऊ अमित घोगरे असे कामासाठी शेटफळ याठिकाणी जात असताना वाटेमध्ये कॅनॉलजवळ शेटफळ गावाचे हद्दीत जयर्वधन उर्फ मुन्ना दैन व प्रदिप पोळ असे फिर्यादीला च्या गाडीजवळ येवुन फि॥ची गाडी थांबवुन जयर्वधन उर्फ मुन्ना दैन याने फिर्यादीला शिवीगाळ करुन जयर्वधन उर्फ मुन्ना दैन याने त्याच्या पॅन्ट मध्ये खोचलेली पिस्टल काढून फि॥च्या कपाळाला लावुन बोलले की, “मी आताच्या आता तुला मारून टाकतो. तू माझे फोन उचलत नाही. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे.”
असे बालुन फिर्यादीला खंडणी मागीतली. त्यावेळी फिर्यादीला चा भाऊ संकेत हा जयर्वधन उर्फ मुन्ना दैन याचा पाय पकडून विनवणी करून बोलत होता की,”माझे भावाला काही करू नको.” त्यावर जयर्वधन उर्फ मुन्ना दैन बोलला की, “तुम्हा देशमुखांना खुप माज आला आहे. तुम्ही लोक मला हलक्यात घेत आहे.” त्यावर मी त्यास “माझेकडे खरच पैसे नाहीत” असे बोललो असता जयर्वधन उर्फ मुन्ना दैन हा बोलला की, “आता तुमच्याकडे पैसे नाहीत. मी मुन्ना दैन कधी रिकामा हाताने जात नाही.” असे बोलून जयर्वधन उर्फ मुन्ना दैन याने फिरडीच्या च्या गळ्यामधील सोन्याची चैन हिसकावून आरोपी मुन्ना दैन याने फिर्यादी यांना जिवे मारण्याचे उद्देशाने त्यांचे दिशेने पिस्टल मधुन दोन राऊंड फायर केले आहे.
व त्याच्या सोबतीला असणारा त्याचा साथीदार प्रदीप पोळ याच्याकडे चैन दिली आणि तेथुन निघून गेला.
तसेच त्यानंतर दि.२९/०४/२०२५ रोजी दुपारी १२:३० वा. चे सुमारास फि॥चा चालक प्रतिक शंकर देशमुख हा फि॥ च्या शेतामध्ये जात असताना माने वस्ती, वांगी नं. १, ता. करमाळा याठिकाणी आला असताना जयर्वधन उर्फ मुन्ना दैन याने फि॥चा चालक प्रतिक शंकर देशमुख यालाही शिवीगाळ करुन “तुझा मालक मला पैसे देत नाही. त्याने पैसे दिले नाहीत. त्यामुळे तु त्याचे काम करायचे नाही.” असे बोलुन कोयत्याचे मागची मुठीने डावे पायाचे पंजावर व नडगीवर मारहाण करुन जखमी केले म्हणुन फिर्यादीने इसम नामे १) जयर्वधन उर्फ मुन्ना हनुमंत दैन, रा. वांगी नंबर १, ता.
करमाळा, जि. सोलापूर व २) प्रदीप मुकंद पोळ, रा.शेटफळ, ता. करमाळा यांचेविरुध्द तक्रार दिल्याने करमाळा पोलीस ठाणे ३३१/२०२५ भा.न्या.सं.क ३०८(२), ३०८(३),३०८(४), ३०८ (५), ११९(१), ११८(१), ११५, ३५१(२), ३५२, ३(५), शस्त्र अधि क ३,४,२५, महा. पोलीस अधि.क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आल्या नंतर सदर गुन्हयाचा तपास सहा. पो. नि. श्री पोपट टिळेकर हे करीत असुन त्यांनी आरोपींना रितसर अटक करुन त्यांना मा. बार्शी न्यायालय येथे हजर केले असता त्यांना दि. ०५/०५/२०२५ रोजी पर्यत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. गुन्हयाचे तपासात आरोपी कडुन एक पिस्टल, एक रिकामी पुंगळी, एक तलवार, एक स्कॉर्पीओ कार जप्त करणेत आलेली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि./ रणजीत माने, स.पो.नि./ पोपट टिळेकर, पो.उप.निरी. / सुशीलकुमार पाखरे, पो. हवा./अजित उबाळे, पो.ना./११६२ मनिष पवार, पो.ना. /९१२ वैभव ठेंगल, पो.शि./१५५० तौफिक काझी, पो.शि./१७४८ ज्ञानेश्वर घोगडे, पो.शि./११४३ सोमनाथ जगताप, पो.शि./८५६ अर्जुन गोसावी, पो.शि./२१४२ गणेश शिंदे, पो.शि./६८९ योगेश येवले, पो.शि./४३८ रविराज गटकुळ, पो.शि./१५२४ अमोल रंदील यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपस स.पो.नि./ पोपट टिळेकर हे करीत आहे