maharashtrapoliticalsocialsolapur

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन…

सोलापूर

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैराग तालुका बार्शी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.शिबिराचे उद्घाटन डॉ. खूपसुरे साहेब बालरोग तज्ञ यांनी दीप प्रज्वलित करून केले.
त्यानंतर डॉ. खूपसुरे यांनी रक्तदान करण्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. उद्घाटन प्रसंगी सोलापूर जिल्हा अध्यात्मप्रमुख श्री शरदजी मते सर, तसेच बार्शी तालुका सेवा अध्यक्ष सचिन चव्हाण, तसेच ज्येष्ठ गुरुबंधू श्री भारत नवले सर, व तालुका सचिव प्रमोद सरवदे, महिला अध्यक्ष तृप्ती घारे, कॅप्टन शोभा बंड,तालुका अध्यात्मिक प्रमुख स्वाती मिरगणे, तालुका ब्लड कॅम्प प्रमुख बाळासाहेब घळके, वैराग सेवा केंद्र अध्यक्ष श्रद्धा कदम, माजी जिल्हा सचिव सचिन बुरंगे, माजी जिल्हा कर्नल श्रीराम वेळे मामा तसेच सर्व भक्त, शिष्य, साधक, हितचिंतक आदि मान्यवर उपस्थित होते.


रक्तदान महायज्ञ माध्यमातून महाराष्ट्रामध्ये दिनांक 4 जानेवारी ते 17 जानेवारी 2025 पर्यंत 14 दिवसात 943 रक्तदान कॅम्प मधून एकूण 101111 रक्त कुपिका संकलित करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रामध्ये सिकलसेल, ॲनेमिया हिमोफिलिया, थॅलेसिमिआ, ब्लड कॅन्सर ,किडनी फेल्युअर ,पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपिढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाने निश्चित केले आहे.*
त्यानुसार वैराग येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे या शिबिरामध्ये तीन वाजेपर्यंत 61 दात्याने रक्तदान करून या महायज्ञामध्ये भाग घेतला आहे. तसेच हे शिबिर सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहणार आहे.
या शिबिरामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त साधक शिष्य सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button