आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ऑल आऊट मोहीमे दरम्यान अभिलेखा वरील हिस्ट्रीशिटर, रेकॉर्ड वरील आरोपी व 2 प्लस मधील आरोपी यांना चेक …
सोलापूर तालुका, पोलीस ठाण्याची कामगिरी...

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी मालाविषयक व शरिराविषयक गुन्हे करणारे आरोपी यांना गुन्हे करण्या पासुन परावृत्त करून गुन्हयास प्रतिबंध करणे करीता दिनांक 20.08.2024 रोजी सोलापूर ग्रामीण जिल्हयात ऑल आऊट ऑपरेशन ही मोहीम राबविण्यात आली होती.
मा.श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री. राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली ऑल आऊट मोहीमे दरम्यान सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील तसेच पोलीस ठाणे कडील अंमलदार यांनी सहभाग नोंदविला होता.
ऑल आऊट मोहीमे दरम्यान सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या अभिलेखा वरील 2 प्लस मधील 7 आरोपी यांना चेक केले त्यापैकी 4 आरोपी मिळुन आले त्यापैकी 3 आरोपी जेल मध्ये आहे. रेकॉर्ड वरील 8 आरोपी यांना चेक केले, 11 हिस्ट्रीशीटर यांना चेक केले त्यापैकी 5 मिळुन आले होते. मिळुन आलेल्या सर्वांना पोलीस ठाणेस बोलावुन त्यांचेकडे चौकशी विचारपूस करून त्यांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करून चांगला मार्गाचा अवलंब करण्याची समज देऊन मार्गदर्शन केले आहे.
ऑल आऊट मोहीमे दरम्यान सोलापूर तालुका, पोलीस ठाणे गुरनं 398/2024 भारतीय न्याय संहिता कलम 64,115(2),352,351(2) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन त्यास शिताफीने पकडुन तपासकामी ताब्यात घेण्यात आले असल्याचे मा.श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राहुल देशपांडे, पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरणातील व इतर पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.