Breaking:- अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमास अटक एक चारचाकी वाहनासह एकूण ३ लाख १२ हजार रु. पर्यंतचा मुद्देमाल हस्तगत जेलरोड पोलीस ठाण्याची कामगिरी….

सोलापूर
रमजान सणानिमित्त जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश सोनवणे – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील कर्मचारी गंगावणे, नदाफ , खान, सिनारे, असे सर्वजण मिळून पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक इसम हे त्याच्या ताब्यातील ग्रे कलरची मारुती सुझुकी वॉगनर वाहन क्रमांक एम.एच २० बी वाय ७७८१ या वाहनातून अवैध रित्या देशी , विदेशी दारूच्या बाटल्या जोड बसवण्णा चौक ते जिजामाता दवाखाना मार्गे जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश सोनवणे – पाटील यांनी सापळा लावला.जेलरोड पोलीस ठाणे दरम्यान असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस बगीचा जवळ संबंधित एकास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सिद्धाराम राचप्पा खजुरगी वय ४५ वर्षे राहणार नीलम नगर श्रीशैल किराणा दुकानाजवळ सोलापूर असे सांगितले.तपासाच्या अनुषंगाने आरोपीकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवा – उडवीची उत्तरे देऊ लागला खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी वाहन ,वाहनातील ११ खाकी पुठ्याचे बॉक्स व पाच पांढऱ्या पिशव्या दिसून आल्या.त्या पिशवी मध्ये कंपनीचे विदेशी दारूचे विविध आकाराच्या दारूच्या बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या . दारू वाहतुकीचा परवान्याबाबत चौकशी केली असता त्याने परमिट नसल्याचे सांगितले .
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमाला मध्ये रॉयल स्टॅग, ब्लॅक डिलक्स कंपनीची व्हिस्की, ऑक्समिथ कंपनीची व्हिस्की , मॅकडॉल कंपनीची विस्की , यासह विविध कंपनीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. जेलरोड पोलिसांनी एकुण गुन्ह्यात ३ लाख १२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे { परिमंडळ } ,सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १ पोमण, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलिस उपनिरीक्षक भाऊराव बिराजदार { गुन्हे} , गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक नीलेश पाटील – सोनवणे , पोलिस उपनिरीक्षक सातपुते , सहाय्यक फौजदार शरीफ शेख , गजानन कणगिरी, कर्मचारी शेख , बाबर, गंगावणे, माने, धुमाळ, नदाफ, वायदंडे, सावंत, जाधव, सिनारे , यसलवाड, देकाणे यांनी कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले….