२६ मार्चपासून मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा, १ लाखांचे पारितोषिक….

सोलापूर
शहर जिल्ह्यामधील मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी मराठा प्रीमियर लीग २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे तर अंतिम सामना ३० मार्चला खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेच हे दुसरे वर्ष आहे. या स्पर्धेमध्ये सोलापूर शहरांमधील आठ संघ व सोलापूर ग्रामीण मधील आठ संघ असे सोळा संघाने सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा टेनिस बॉलवर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण २५६ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे अशी माहिती आयोजक प्रशांत बाबर यांनी दिली आहे.
या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना ड्रेस प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपयांचे आहे. द्वितीय पारितोषिक ५१ हजार रुपयांचे शुभम भोसले यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. तृतीय पारितोषिक २५ हजार रुपयांचे विजय कोकाटे मोहोळ यांच्या वतीने देण्यात आलेले आहे.
या पत्रकार परिषदेला राम साठे, शंकर पवार,सागर गव्हाणे,रोहित जाधव,प्रा.आश्विन नागणे आदी उपस्थित होते.