Speed news:- १२ बांगलादेशींना अटक दहशत वाद विरोधी पथक सोलापूर युनिट व MIDC पोलिसांची संयुक्तिक दमदार कामगिरी….

सोलापूर
बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्या.सोलापूर दिव्यांगासाठी कार्यरत असणारी सहकारी औद्योगिक संस्था प्लॉट नं.२० /२ ई आर टी चौक एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापूर येथे नाव नासिर सरकार मो. बदी उज्जमान वय २२ वर्षे , मोहम्मद नजीरउल इस्लाम वय ३० वर्षे , मोहम्मद मिजानूर रोहमन वय २६ वर्षे , बाबुमियां सुलतान वय २५ वर्षे , शफीक रशीद मोडल वय ३१ वर्षे , मोहम्मद रहुलआमीन खलील फोराजी वय ३३ वर्षे, इम्रान नुरआलम वय २७ वर्षे , मोहम्मद हसन मो. आलम मियां वय २८ वर्षे , महमद हजरत अली पोलाश वय ३१ वर्षे , मोहम्मद सोहेल जाबेदअल्ली सरदार वय २२ वर्षे, अलाल नूर इस्लाम मियां वय ३५ वर्षे, मोहम्मद अलीमीन हानिफ बेफिरी वय २९ वर्षे यांनी भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैध परवानगी , कागद पत्रांशिवाय तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी { नोंदणी} अधिकारी यांच्या लेखी परवानगी शिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करत असताना दहशत वाद विरोधी पथक सोलापूर युनिट व एम. आय.डी.सी पोलिसांना मिळून आले.त्यामुळे पथकाने व पोलिसांनी या बांगला ताब्यात घेत.
या बांगला देशीं विरोधात MIDC पोलिस ठाण्यात भारतीय पारपत्र अधिनियम १९५० चे कलम ३( अ) ,६ (अ), सह परकीय नागरिक आदेश १९४८ च्या कलमानुसार चे कलम ३(१),विदेश व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम , १४ सह भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४),३३६(३),३३८ प्रमाणे या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्रप्रसाद वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कायदेशीर गुन्हा दाखल केला.पुढील तपास पोलिस निरीक्षक खोमणे करीत आहेत.आरोपींकडून पोलिसांनी विविध स्मार्ट फोन हस्तगत केले आहे. या कारवाईसाठी दहशत वाद विरोधी पथक सोलापूर युनिट व MIDC पोलिसांनी अथक परिश्रम घेतले….