जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्ककडून अवैध हातभट्टी दारु निर्मिती/विक्री / वाहतुकीवर झालेल्या कारवाईत एकूण ५२ लाख १९ हजार १०२ चा मुद्देमाल जप्त….

सोलापूर
राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी मा. श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त, पुणे विभाग याच्या निर्देशानुसार व भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, एन. पाटील प्र. उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर यांचे समवेत दि. १६/०१/२०२६ ते २८/०१/२०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री, अवैध हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण ८३ गुन्हे नोंद करण्यात आले. असुन ८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत २४,०७५ लि. रसायन, १६२६ ब.लि. हातभट्टी दारु, ३९३ ब. लि. देशी मद्य, १८९ ब.लि. बनावट देशी मद्य, ३६८ ब.लि. विदेशी मद्य, १९८९ ब.लि. परराज्यातील विदेशी मद्य, १७००० बनावट बुचे, ८० ब.लि. बिअर, ६२५ लि. ताडी तसेच ०३ चारचाकी वाहन व ०७ दुचाकी वाहनांसह एकुण रूपये ४९ लाख ६७ हजार १०२ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच या विभागाकडुन दिनांक २५/०१/२०२६ ते २८/०१/२०२६ या कालवधीमध्ये निरीक्षक पंढरपूर विभाग या कार्यालयाने सांगोला तालुक्यातील निजामपूर येथे कारवाई करुन ३४६ ब.लि. बनावट विदेशी मद्य तसेच बनावट बुचे, बनावट लेबले, ईत्यादीसह एकुण रुपये ५.०३,८४०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एक आरोपीस अटक करण्यात आली अहे.
तसेच निरीक्षक ब विभाग सोलापूर या कार्यालयाने सोलापूर शहरातील जुना विडी घरकुल परिसरात कारवाई करुन अवैध परराज्यातील गोवा बनावटीचे ५६० ब.लि. मद्य एक दुचाकी वाहनासह एकुण रुपये ९,२०,१२५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच निरीक्षक भरारी पथक क्र.१ या कार्यालयाने मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी येथे कारवाई करुन १८९ ब. लि. बनावट देशी मद्यासह एकुण रुपये ८४०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एक आरोपीस अटक करण्यात आली आहे. तसेच निरीक्षक अ विभाग व दुय्यम निरीक्षक अ ३ विभाग यांनी केलेल्या संयुक्तीक कारवाई मध्ये मौजे खवणी ता. मोहोळ जि.सोलापूर येथे गोवा राज्य निर्मित २२५ ब.लि विदेशी मद्य जप्त करुन एकूण रु.२ लाख ५२ हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच या विभागाकडुन या कालावधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या एकूण ०८ ढाब्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले असून एकुण २४ आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे.
तसेच अश्या प्रकारची धडक कारवाई पुढेही अशाच प्रकारे कारवाई चालू राहणार असुन आचारसंहितेच्या पार्श्वभुमीवर या विभागाकडुन विषेश पथके नेमण्यात आली आहेत.
ही कारवाई प्र.उपअधीक्षक जे. एन. पाटील, निरीक्षक आर.एम. चवरे, .
ओ व्ही घाटगे, राकेश पवार श्री पंकज कुंभार, श्री. सचिन भवड, तसेच दुय्यम निरीक्षक सर्वश्री एस.डी. कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, आर. एम. कोलते, सुखदेव सिद, सचिन शिंदे समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री. संजय चव्हाण, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, अण्णासाहेब फड, कपिल स्वामी, गजानन ढब्बे, तानाजी जाधव, पवन उगले, योगीराज तोग्गी स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, पंढरीनाथ भुतेकर, मंगेश मारसिंग, महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.
महत्वाचे आवाहन
अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ द्वारे या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.



