crimemaharashtrapoliticalsocialsolapur

मड्डी वस्ती खून खटला तिघांची निर्दोष मुक्तता मात्र एकास जन्मठेप….

.

HTML img Tag Simply Easy Learning

 

सोलापूर – नामदेव गजानन चौगुले वय 42 रा:-तळेहिप्परगा, सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर. जे. कटारिया यांनी १)अजय आडप्पा भांडेकर वय:-३०, २) विजय आडप्पा भांडेकर वय:-२७ दोघे रा- तळेहिप्परगा सोलापूर ३) बाबुराव गुंडपा लिंबोळे वय:-४४ रा:- मड्डी वस्ती सोलापूर या तिघांचे निर्दोष मुक्तता केले तर शंकर गुंडप्पा लिम्बोळे वय 43 रा:- मड्डीवस्ती, सोलापूर यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

 

 

 

 

या हकीकत अशी की, यातील मयत नामदेव चौगुले याने आरोपी शंकर लिंबोळे यांच्या पत्नीची छेडछाड केली होती. त्यावरून आरोपी शंकर यांच्या पत्नीने मयताविरुद्ध तक्रार दिली होती. दिनांक ७/९/२०२१ रोजी रात्री 10:00 सुमारास आरोपी शंकर याची पत्नी घरी झोपली असता रात्री साडेदहाच्या सुमारास त्याच्या घराच्या दरवाज्यावर कोणीतरी लाथा मारू लागला म्हणून आरोपी शंकर याने दरवाजा उघडला असता, त्यावेळेस मयत नामदेव चौगुले हा होता व तो त्यास म्हणत होता की, “तुझ्या पत्नीने दिलेली तक्रार मागे घे” म्हणून शिवीगाळ करत होता, त्यावेळी आरोपी बाबुराव लिंबोळी यांनी मिरचीची पूड मयताच्या अंगावर टाकली, त्यामुळे शंकर हा घरातून कुऱ्हाड घेऊन आला व मयत पळून जात असताना नामदेव याने कुऱ्हाडीने त्याच्या पायावर वार करून इतर आरोपींनी लाकडी काठी व पाईपने मारहाण करून नामदेव यांस जीवे ठार मारले, त्यास ठार मारून शंकर हा स्वतःहून कुऱ्हाडीसह पोलिस ठाण्यात हजर झाला, त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोप पत्रक दाखल केले होते.

 

 

 

या खटल्यात सरकारतर्फे एकूण 29 साक्षीदार तपासण्यात आले.खटल्याच्या सुनावणीच्या वेळी ॲड. मिलिंद थोबडे यांनी आपली युक्तिवादात, खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून असून खटल्यात सरकार पक्षातर्फे ठोस असा पुरावा आला नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली मात्र एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

 

यात आरोपींतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी यांनी तर सरकारतर्फे ॲड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button