राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन….
शिबिरास महिलांचा उदंड प्रतिसाद....

सोलापूर
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य महिला आयोग अध्यक्ष तथा महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, सोलापूर निरीक्षक दिपाली पांढरे यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांच्या वतीने महिला दिनाचे आवचित्य साधून राष्ट्रवादी भवन कार्यालय द स्केअर मॉल येथे शनिवारी महिलांच्या विविध प्रकारच्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेस डाॅ दिपीका चिंचोळी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी त्यांच्या भाषणात कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.या शिबिरासाठी स्वस्तिक हॉस्पिटल चे, डॉ. वीणा माने – कात्रे,डॉ.दिपीका चिंचोळी, वैशाली प्रक्षाळे यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या भाषणात उपस्थित महिला वर्गास प्रथमतः महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आजच्या दैनंदिन जीवनात महिला भगिनींना तारेवरची कसरत करावी लागते. प्रपंच आणि आपले काम यातच महिलांचा संपूर्ण दिवस जातो . यामध्ये महिलांनी आपले आरोग्य उत्तम आणि निरोगी ठेवण्यासाठी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी घेतलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
यावेळी शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले मध्य विधानसभा अध्यक्ष मा.अर्चना दुलंगे, शोभाताई गायकवाड दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष रेणुका मंद्रूपकर , लक्ष्मी पवार, मीना जाधव, सरोजनी जाधव, उमादेवी झाडबुके, राजश्री परशेट्टी, जयश्री झाडबुके, यांच्या सह उपस्थित महिला वर्गाची उपस्थिती होती….