maharashtrapoliticalsocialsolapur

अजितदादा पवार यांनी ओबीसी प्रवर्गाच्या हिताचे घेत असलेले निर्णय व भूमिका ओबीसी समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे :कल्याण आखाडे { प्रदेशाध्यक्ष OBC}….

सोलापूर

राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली OBC विभागाच्या वतीने राज्यात संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.22 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत या संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्त OBC विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे हे पक्ष संघटन वाढीसाठी व अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी संपर्क अभियानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करतायत . याचाच एक भाग म्हणून कल्याण आखाडे यांनी शुक्रवारी सोलापूर दौरा केला .राष्ट्रवादी भवन कार्यालयात ढोल – ताश्याच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले.तसेच अजित दादा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री झाल्याने या मेळाव्यात दादांचा अभिनंदनाचा ठराव मांडून राष्ट्रवादी भवन कार्यालया समोर जल्लोष करण्यात आला . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, एकच वादा अजित दादा अशा घोषणांनी जुनी मिल कंपाऊंड परिसर दणाणून सोडला होता.प्रथमता युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला.

OBC विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे आज यांचा वाढदिवस असल्याने फेटा शाल पुष्पगुच्छ देऊन केक कापून शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविकात OBC सेल विभागाचे अध्यक्ष अनिल छत्रबंद यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली .Obc जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण यांनी स्वागत केले यानंतर प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी आपल्या मनोगतात प्रथमतः कल्याण आखाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष संघटन वाढीसाठी प्रत्येकाने विश्वासाने सोपावलेल्या जबाबदारीचे भान राखून व जबाबदारी समजून सर्वोतोपरी प्रयत्न करावेत . अजित दादांचे आचार विचार, दादांनी OBC समाज बांधवांसाठी मंजूर केलेल्या योजनांचा लाभ OBC समाजातील प्रत्येक बांधवां पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम घेणे गरजेचे आहे. असे मनोगत व्यक्त केले.

 

 

 

OBC सेल विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी त्यांच्या भाषणात सुरुवातीला वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्या बद्दल आभार व्यक्त केले. संपर्क अभियानाच्या माध्यमातून 22 फेब्रुवारी ते 15 मार्च राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या सूचनेनुसार राज्यभर दौरे करत असून राज्यभर obc समाज अजितदादा सोबत जोडला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.श्री.अजितदादा पवार साहेब ओबीसी प्रवर्गाच्या हिताचे घेत असलेले निर्णय व भूमिका ओबीसी समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी करावे तसेच ओबीसीतील संख्येने अतिशय अल्प असलेल्या जात घटकांपर्यंत पोहोचून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व जिल्हा परिषद निवडणूक काही महिन्यावर आल्या असून त्या दृष्टिकोनातून संघटन वाढीसाठी प्रत्येकाने पूर्ण ताकदीने आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.


यावेळी शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे जेष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,ज्येष्ठ नेते ॲड. सलीम नदाफ, माजी नगरसेवक गणेश पुजारी,OBC सेल विभाग प्रदेश कार्याध्यक्ष संजय आवटे, OBC विभाग प्रदेश सरचिटणीस डॉ. बसवराज बगले, निरीक्षक संतोष राजगुरू , संतोष भाकरे , OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, कार्याध्यक्ष आयुब शेख, प्रा.श्रीनिवास कोंडी सर , फारूक मटके, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी, कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश झाडबुके,सुरेखा घाडगे, अर्चना दुलंगे, उमादेवी झाडबुके, अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष अशपाक कुरेशी, प्रज्ञासागर गायकवाड यांच्या सह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button