विद्यार्थ्यांना किल्ले गडदर्शन शिव विचारांची मेजवानी…
स्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादी सहकार सेल चा उपक्रम ...

सोलापूर.
राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून शिवजयंती निमित्त स्वराज सप्ताह चे आयोजन करण्यात आले असून त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर भुईकोट किल्ला येथे राष्ट्रवादी शालेय विद्यार्थ्यांना किल्ले गडदर्शन शिव विचारांची जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेल विभागाचे अध्यक्ष भास्कर आडकी आणि सोलापूर शहर सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते .
भुईकोट किल्ला दर्शन आणि शिवविचाराचा जनजागृती या उपक्रमांत 150 विद्यार्थ्यांची सहभाग नोंदविला येथील प्राचीन शिल्पांची माहिती यावेळी
प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती संशोधक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ विशाल फुटाणे यांनी माध्यमांना दिली.
पूर्वीच्या लढाया साठी प्राचीन शिल्पातून वापरलेल्या युक्तीची माहिती ही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र बसून अल्पउपहार घेऊन एक सहलीचा आनंद लुटला..
यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी,
अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष अमीर शेख, ग्रामीण अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष नजीर इनामदार ,शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, प्रज्ञासागर गायकवाड ,
दत्ता बनसोडे , सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, महिला आघाडी सचिव प्राजक्ता बागल, यांच्या सह इतर पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या स्तुत्य उपक्रमाचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.